सोलापुरातील मातीच्या वस्तू बनवणारे विकास कुंभार यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. त्यांनी प्लास्टिकच्या कंदीलला पर्यावरणपूरक मातीचा पर्याय तयार केला आहे. विकास आणि त्यांचे भाऊ देविदास कुंभार या दोन्ही बंधूंनी मिळून हे पर्यावरणपूरक कंदील बनवले आहेत. मातीपासून बनवलेल्या आकाशदिवे व त्यावरील सुंदर नक्षीकाम, मनमोहक रंगसंगती, बहुरंगी एलईडी दिवे व सहजपणे घराबाहेर टांगून ठेवता येईल अशा पद्धतीने हे कंदील बनवले असून ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
advertisement
मातीपासून बनवलेले आकाश कंदील ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. मातीच्या एका आकाश कंदिलाची किंमत 260 ते 370 रुपये पर्यंत आहे. तसेच विकास यांच्याकडे 30 रुपयांपासून पणत्या देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर या दिवाळीत आकाश कंदील व पणती विक्रीतून 22 ते 23 लाख रुपये पर्यंतची उलाढाल होणार असल्याची माहिती कुंभार यांनी दिली.