आज सकाळी 11 वाजता महानैवेद्यानंतर देवाचा पलंग निघाला. आषाढी सोहळ्यासाठी देवाचे सर्व राजोपचार आजपासून बंद झाले आहेत. मंदिर आता भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. आजपासून देवाला थकवा जाणवू नये म्हणून पाठीला कापसाचा लोड लावला आहे. आजपासून आषाढी यात्रा होईपर्यंत देव झोपण्यास जात नसल्यानं देवाचा पलंग निघणार आहे. त्यामुळं भाविकांना आजपासून 26 जुलैपर्यंत श्री विठ्ठलाचे 24 दर्शन सुरू राहणार आहे.
advertisement
आजपासून एका मिनिटात 30 ते 35 भाविक श्री विठ्ठलाचे पददर्शन घेऊ शकणार आहेत. तर दिवसभरात 30 ते 35 हजार भाविकांचे पददर्शन घडवले जाऊ शकते. साधारणपणे एक लाखाच्या आसपास भाविकांचे दररोज मुखदर्शन होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आजपासून म्हणजे 27 जून ते 16 जुलैपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.
प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठल मंदिर रात्री दर्शनासाठी बंद राहणार आहे. आजपासून 'व्हिआयपी' दर्शन बंद असणार आहे. जास्तीत जास्त सर्वसामान्य वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ मिळण्यासाठी दर्शन रांगेत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
घराचं ब्रह्मस्थान कुठं असतं? तेवढीच जागा रिकामी सोडल्यानं इतके फायदे मिळतात
दरम्यान, आता आषाढी वारीचे वेध पांडुरंगाच्या भक्तांना लागले आहेत. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. ही वारी म्हणजे एक यात्रा नसून, वारकरी संप्रदायाच्या भक्तीचे, एकोप्याचे आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक मानली जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या विठोबा-रखुमाईच्या दर्शनासाठी पायी जातात. २०२५ मध्ये आषाढी एकादशी ६ जुलै २०२५ रोजी आहे.
