सोलापूर शहरातील पार्क चौक येथील खंदक बागेत गेल्या एक वर्षापासून श्रीधर खेडगीकर यांनी ‘प्रिसिजन वाचन कट्टा’ सुरू केला आहे. खंदक बागेत सकाळच्या सुमारास व्यायामासाठी आलेले तरुण-तरुणी, तसेच ज्येष्ठ नागरिक व्यायाम, योगा केल्यानंतर बागेत मोबाईल बघण्यामध्ये मग्न होतात. समाजातील सर्व वयोगटातील लोकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रिसिजन बुक क्लबने एक खास उपक्रम सुरू केला.
advertisement
Goat Farming: नोकरी सोडली, तरुणाने घेतल्या 5 शेळ्या, आता वर्षाला 5 लाखांची कमाई, Video
सोलापूर शहरातील पार्क चौक येथे असलेल्या खंदक बागेत प्रिसिजन वाचन कट्टा 2024 साली सुरू करण्यात आला आहे. वाचकांना आवडणारी पुस्तके किंवा त्यांच्या मागणीनुसार पुस्तके दर रविवारी वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतात. महत्त्वाच्या म्हणजे यासाठी कोणतीही फी भरावी लागत नाही. तसेच पुस्तक घरी वाचण्यासाठी घेऊन जाण्याची मुभा देखील आहे.
खंदक बागेत आलेले विद्यार्थी, तरुण-तरुणी तसेच वयोवृद्ध नागरिक आठवड्यातील काही तास मोबाईल पासून परावृत्त होत असून वाचनाची गोडी निर्माण होत आहे. पुस्तकाचे वाचन झाल्यानंतर वाचक मंडळी एकत्र येऊन वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा देखील करतात. तसेच एखाद्या वाचकाजवळ लेखकांची पुस्तके असतील तर या पुस्तकांची देवाण-घेवाण सुद्धा या ठिकाणी मोफत केली जाते. कथा, कादंबरी, प्रेरणादायी ग्रंथ, काव्य संग्रह, धार्मिक ग्रंथ यासह इतर साहित्याचा यामध्ये समावेश आहे. दर रविवारी सकाळी 8 ते 9 या वेळेत हा उपक्रम चालतो.





