सोलापूर : कोणतेही यश संपादन करायचे, मिळवायचे असेल तर मनातील जिद्द व चिकाटीने सहजपणे खेळ, व्यवसाय, शिक्षणामध्ये यशस्वी होता येते हे सोलापूरच्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर पंचाक्षरी लोणार याने करून दाखवलं आहे. यामुळेच दररोज पाच ते सहा तास व्यायाम करून त्यानं शरीर पिळदार बनवलं. अंगी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी, परिश्रम, कष्ट करण्याची तयारी ठेवली अन् त्या मार्गानं प्रवास सुरू केला. रिक्षा चालक ते गोल्ड मेडलिस्ट पंचाक्षरी लोणार यांचा हा प्रवास कसा होता, आज या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
advertisement
पंचाक्षरी लोणार (रा. विजापूर रोड एस आर पी एफ कॅम्प विष्णुनगर सोलापूर) यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. यामुळे शिलाई मशीन तयार होणाऱ्या कारखान्यामध्ये अगदी लहानपणीच त्यांनी मजूर म्हणून कामाला सुरुवात केली. मात्र, तेथेही घरची आर्थिक घडी बसत नव्हती म्हणून ऑटोरिक्षा चालवत कुटुंब सांभाळत फिटनेसची आवड चालूच ठेवली.
50 वर्षांपूर्वीचं तीच जुनी मापं, पण आजही सुरुये तोच व्यवसाय, पुण्यातील घोगे काकांची अनोखी गोष्ट!
वयाच्या 16 वर्षी बॉडीबिल्डिंगमध्ये आपला प्रवास सुरू केला. तंदुरुस्तीचा विचार केला तर अन्न आणि आहार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यासाठी महिन्याकाठी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र, तेवढी रक्कम उभी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. अन्वर शेख आणि रविकांत व्हनमारे यांनी खेळात मार्गदर्शन केले. सोलापूर जिल्हा बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनने कायम त्याच्या पाठीशी उभी आहे. तसेच मॅक्झिमम ग्रुपच्या माध्यमातून त्याला दरमहिन्यास सहकार्य केले जाते.
पंचाक्षरी लोणार यांनी आतापर्यंत विविध स्तरावर आपली कामगिरीची चमक दाखविली आहे. दरम्यान, साऊथ एशिया, मिस्टर इंडिया, मि. युनिव्हर्स, वरिष्ठ महाराष्ट्र श्री, वरिष्ठ भारत श्री, महाराष्ट श्री, पश्चिम महाराष्ट्र श्री किताब विजेता 4 वेळा, सोलापूर श्री किताब 12 जिंकला आहे.
आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी घडावी असं प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं. अगदी त्याचप्रमाणे क्रीडाविश्वाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. त्याच स्वप्नपूर्तीसाठी ऑलिम्पिकमध्ये सहभाग हेच एक मुख्य टार्गेट असल्याचे त्यांनी सांगितले.