लग्न उरकून सर्वजण रविवारी रात्री आचेगाव ते वळसंगकडे स्विफ्ट गाडीने येत होते. वळसंग गावाच्या अलीकडे रस्ते अपघातामध्ये कार उलटली आणि हा अपघात झाला. या अपघातामध्ये मैंदर्गी येथे राहणाऱ्या शिवानंद लोहार यांचा एकुलता एक 25 वर्षांचा मुलगा पंकज शिवानंद लोहार याचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये गणेश पोतदार (वय 23, राहणार सोलापूर), दर्शन सुनील गुरव (वय 22, राहणार आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर), निंगप्पा लोटनवरु (वय 23), परमेश्वर तलवार (वय 23) हे तरुण जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा समोरचा भाग चुराडा झाला आहे.
advertisement
'देवा मला माफ कर, मुलांनो आईची काळजी घ्या', तरुणाची रेल्वेसमोर उडी, VIDEO मध्ये धक्कादायक कारण
या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. तरी अपघातात अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात राहणारा पंकज शिवानंद लोहार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या दर्शन गुरव, गणेश पोतदार, परमेश्वर तलवार आणि लिंगप्पा लोटेनवरु या तरुणांच्या डोक्याला, चेहऱ्याला, हाता-पायाला, नाकाला जखमा झाल्या आहेत.
दरम्यान, हा भीषण अपघात कसा झाला? याचा तपास सध्या पोलिस करत असून या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे. अपघाताची माहिती नातेवाईकांना मिळताच सोलापुरातील शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.






