पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश मल्लेशा पाटील (वय 50) हे मुंढेवाडी येथील शेतकरी पत्नीसोबत ब्रह्मपुरी येथील बँकेमधून पैसे काढण्यासाठी आले होते. पत्नीला बँकेत सोडून ते आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी निघाले. तेव्हा मंगळवेढा - ब्रह्मपुरी रोडवर आंध्र प्रदेश राज्यातील पासिंग असलेल्या कारने प्रकाश यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की कारने प्रकाश यांना दुचाकीसह 100 मीटरपर्यंत फरफतट नेले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
‘आई, लवकर पैसे पाठतो..., सकाळचा ‘तो’ फोन शेवटचा, 19 वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर
कार चालक थेट पोलिसांत
अपघातानंतर कार मधील पती - पत्नी मारहाणीच्या भीतीने थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि अपघाताची संपूर्ण माहिती सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्या सीसीटीव्हीमध्ये अपघाताची भीषणता स्पष्ट दिसून आली. या अपघाताची माहिती मिळताच गावातील शेकडो तरुण व गावकरी मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले होते.
स्वप्न अधुरंच राहिलं
अपघातात मृत झालेले शेतकरी प्रकाश पाटील यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. दोन ते तीन दिवसांपूर्वीच एक स्थळ पाहण्यासाठी येऊन गेले होते. प्राथमिक बोलणी झाल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. काही दिवसांमध्ये लग्नाची तारीख घेण्यासाठी बैठकी होणार होती. पण या घडलेल्या अपघाताने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.






