TRENDING:

Wheelchair : भंगारातून एक एक साहित्य घेतलं, दिव्यांगासाठी बनवली व्हीलचेअर, खास VIDEO

Last Updated:

फारुक सय्यद हे भंगारमधील सायकलला सुद्धा नवीन रूप देण्याचे काम ते करत आहे. भंगारामधील साहित्य वापरून फारुक सय्यद यांनी वृद्ध, दिव्यांग यांच्यासाठी उपयुक्त अशी व्हीलचेअर बनवली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : सोलापूर शहरातील गुरुनानक चौकात सातवीपर्यंत शिक्षण शिकलेले फारुक सय्यद यांचे लहानसे सायकल दुकान आहे. फारुक सय्यद हे भंगारमधील सायकलला सुद्धा नवीन रूप देण्याचे काम ते करत आहे. भंगारामधील साहित्य वापरून फारुक सय्यद यांनी वृद्ध, दिव्यांग यांच्यासाठी उपयुक्त अशी व्हीलचेअर बनवली आहे. या संदर्भात अधिक माहिती फारुक सय्यद यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement

सोलापूर शहरातील फारुक सय्यद यांनी भंगारातील साहित्य वापरून एक व्हीलचेअर तयार केली आहे. जी थेट पायऱ्यांवरून वर आणि खाली जाऊ शकते. वृद्ध, दिव्यांग आणि रुग्णांसाठी मोठा अडथळा ठरलेल्या पायऱ्या आता यामुळे सहज पार करता येणार आहेत. या व्हीलचेअरचा वापर करताना वापरणाऱ्याला उठण्याची गरज भासत नाही आणि केवळ एका व्यक्तीच्या सहाय्याने पहिल्या मजल्यावर नेणे शक्य होते.

advertisement

Exhibition : 100 वर्षांपूर्वीची लिथो पेंटिंग्ज अन् जुने कॅमेरे, पुण्यात दुर्मिळ वस्तूंचे भव्य प्रदर्शन, Video

हे व्हीलचेअर बनवण्यासाठी फारुक सय्यद यांना दोन वर्षांचा कालावधी लागला आहे. तर यासाठी फारुक सय्यद यांना 15 हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे. हा खर्च कमी करून स्वस्तात स्वस्त दिव्यांग आणि वृद्ध लोकांना हा व्हीलचेअर कसा देता येईल यावर फारुक सय्यद सध्या काम करत आहे.

advertisement

लोकसहभागातून आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अशा उपक्रमांचे उत्पादन आणि प्रसार वाढवला गेला, तर अनेकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने सुलभता आणता येईल, असे ते म्हणतात

या साहित्याचा वापर करून बनवली व्हीलचेअर 

या अनोख्या व्हीलचेअरच्या निर्मितीसाठी त्यांनी जुन्या सायकलचे सीट स्प्रिंग, नट-बोल्ट, दुचाकीचे शॉकऍब्सॉर्बर, दवाखान्यातील स्ट्रेचरचे व्हील, प्लायवूड, फायबर शीट्स आणि सायकलचे इतर सुटे भाग वापरलेकेवळ पुनर्वापरातून निर्माण झालेली ही यंत्रणा पर्यावरणपूरक असून, जुनं ते सोनं हे वाक्य सार्थ करणारी आहे. तरी या व्हीलचेअरचा पेटंट सुद्धा नोंदणी करणार असल्याचेही माहिती फारुक सय्यद यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

advertisement

मराठी बातम्या/
Wheelchair : भंगारातून एक एक साहित्य घेतलं, दिव्यांगासाठी बनवली व्हीलचेअर, खास VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल