सोलापूर: अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये झालेल्या अग्नितांडवात सोलापूर होरपळून निघालं. या भीषण आगीत मोठी जीवितहानी झाली. यामध्ये सोलापुरात दानशूर उद्योजक म्हणून ओळखले जाणारे हाजी उस्मान मन्सूरी यांचं देखील निधन झालं. तसेच त्यांच्या कुटुंबातील चौघांना जीव गमवावा लागला. या अग्नितांडवानंतर सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण यांनी लोकल18 सोबत बोलताना उस्मान मन्सूरी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
सोलापूर शहरालगत असणाऱ्या अक्कलकोट रोड एमआयडतीसी येथे सेंट्रल टेक्स्टाईल इंडिस्ट्रीज या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली. यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील प्रसिद्ध उद्योजक हाजी उस्मान मन्सुरी यांचं निधन झालं. तसेच या अग्नितांडवात हाजी उस्मान मन्सूरी यांच्यासह अनस हनीफ मन्सूरी, नातसून शिफा अनस मन्सूरी, अनस यांचा 1 वर्षाचा मुलगा युसुफ मन्सूरी यांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर अग्नितांडव! आग विझवताना साप जखमी, स्थानिकांच्या त्या कृतीचं तुम्हीही कराल कौतुक, Video
सोलापूरने एक दानशूर पुत्र गमावला
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रसिद्ध उद्योजक असणाऱ्या हाजी उस्मान मन्सूरी यांची दानशूर व्यक्ती म्हणून ओळख होती. त्यांना सोलापुरात गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जात होते. मन्सूरी यांच्या कारखान्यात जवळपास 400 ते 500 कर्मचारी काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी कोणतीही जात पात न पाहता गरजूंना मदत केली. लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये गरजूंना मदत केली. तसेच दवाखान्याचा खर्च असो, लग्न असो किंवा कोणतीही अडचण असो ते दूर करण्याचे काम हाजी उस्मान मन्सूरी करत होते, असं शौकत पठाण सांगतात.
शौकत पठाण यांनी सांगितला एक किस्सा
सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण हे मक्का मदिना येथे उमरा हे धार्मिक विधी करण्यासाठी गेले होते. उमरा करून परत आल्यावर त्यांनी हाजी उस्मान मन्सूरी यांच्याकडे गेले. त्यांना काही जा-नमाज (नमाज पठण करताना लागणारी चादर) घ्यायचे होते. सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण यांना 700 जा-नमाज लोकांना देण्यासाठी लागणार होते. हाजी उस्मान मंसुरी यांनी ना नफा - ना तोटा या दराने शौकत पठाण यांना जा-नमाज दिली होती, असे पठाण यांनी सांगितले.
प्रसिद्ध उद्योजक आणि दानशूर व्यक्ती म्हणून हाजी उस्मान मन्सूरी यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सोलापुराती उद्योग जगतातून आणि सर्वसामान्यांतून हळहळ व्यक्त होतेय.