विद्युत मंडळाकडे का गेला? कोयता, काठी घेऊन आले अन्..., पंढपुरात दोघांसोबत भयंकर घडलं
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pandharpur News: विहिरीवरील विद्युत पुरवठा नादुरुस्त झाल्याने त्यांनी विद्युत कंपनीकडे तक्रार दाखल केली होती.
सोलापूर - विद्युत मंडळाकडे तक्रार केल्याच्या रागातून दोघांवर हल्ला करण्यात आला. कोयता, दगड, काठी व लाथाबुक्क्यांनी केलेल्या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात घडली. पृथ्वीराज खारे व युवराज खारे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पृथ्वीराज खारे यांच्या विहिरीवरील विद्युत पुरवठा नादुरुस्त झाल्याने त्यांनी विद्युत कंपनीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने विद्युत कर्मचारी सिताराम लोखंडे हे विद्युत कर्मचारी फिर्यादीच्या शेतातील डीपी जवळ येऊन त्यांना बोलावून घेतलं. दोघेजण त्या ठिकाणी गेले असता, आमची विद्युत मंडळाकडे तक्रार का केली? असे म्हणत त्यांना व त्यांच्या भावाला कोयता, काठी, दगड व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली.
advertisement
पृथ्वीराज किसन खारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अंकुश भानुदास खारे, अमोल खारे, आदित्य खारे, सोन्या उर्फ अक्षय अरुण खारे व संतोष भानुदास खारे सर्व राहणार पंढरपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भांगे हे करत आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 12:31 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
विद्युत मंडळाकडे का गेला? कोयता, काठी घेऊन आले अन्..., पंढपुरात दोघांसोबत भयंकर घडलं










