सोलापूर अग्नितांडव! आग विझवताना साप जखमी, स्थानिकांच्या त्या कृतीचं तुम्हीही कराल कौतुक, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur Fire: सोलापुरात अक्कलकोट एमआयडीसीत टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली. ही आग विझवताना जखमी सापाला उपचार करून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर – सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी येथे रविवारी (18 मे) पहाटे भीषण आग लागली. या आगीत सेन्ट्रल इंडस्ट्रीज या टॉवेल कारखान जळून खाक झाला. तसेच यामध्ये 8 जणांचा जीवही गेला. ही आग विझवत असताना जेसीबीचा खाली येऊन एक साप जखमी झाला होता. स्थानिकांनी सर्पमित्राला बोलून त्या सापावर उपचार करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले आहे. मानवावर संकट आलेलं असताना सापाला दिलेलं जीवदान चर्चेचा विषय ठरतंय.
advertisement
सोलापूर अक्कलकोट एमआयडीसी परिसरात असलेल्या टॉवेल कारखान्यात पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या, पोलीस प्रशासन, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहे. हे आग विझविण्यासाठी जेसीबीने साफ सफाई करत असताना एक साप जेसीबीच्या खाली येऊन जखमी झाला होता. तिथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने सर्पमित्राला फोन करून घडलेली घटना सांगितली.
advertisement
सापाला जीवदान
घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र बसवराज कामुनी हे घटनास्थळी पोहोचले. त्या जेसीबीच्या खाली धामण जातीचा बिनविषारी जखमी झाला होता. तात्काळ घटनासाठी सर्पमित्र बसवराज कामुनी यांनी सापाच्या जखमेवर हळद आणि औषधोपचार केले आणि त्या धामण सापाला जीव वाचवून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले आहे. तर सापावर उपचार सुरू असताना घटनास्थळी नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. आतापर्यंत सर्पमित्र बसवराज कामुनी यांनी 1 हजार अधिक सापांचे जीव वाचविले आहेत. पण आगीच्या दुर्घटनेच्या काळात स्थानिकांनी दाखवलेल्या भूतदयेचं कौतुक होतंय.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 18, 2025 8:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापूर अग्नितांडव! आग विझवताना साप जखमी, स्थानिकांच्या त्या कृतीचं तुम्हीही कराल कौतुक, Video