घरात लहान मुलांचे हसरे आवाज घुमत असताना अचानक सगळं काही शांत झालं. शोभा यांनी आपली एक वर्षाची चिमुकली मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा सासूकडे सोडला होता. मात्र काही वेळातच दोन्ही मुले रडू लागल्याने भावजय त्यांना घेऊन शोभाच्या घरी आल्या. दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून त्या क्षणातच जग थांबल्यासारखं झालं. शोभा गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होत्या. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहून भावजयने एकच किंकाळी फोडली. तिचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
advertisement
तहान लागल्याने दरवाजा ठोठावला, शेवटी तोडून आत प्रवेश, वृद्ध दाम्प्त्याची अवस्था पाहून बसला धक्का
या सगळ्या घटनेचा सर्वात वेदनादायी भाग म्हणजे, आईच्या या अवस्थेचं दृश्य तिच्या लहानग्या मुलानेही पाहिलं. ही भयानक आठवण आयुष्यभर त्याच्या मनात घर करून राहणार आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने शोभा यांना खाली उतरवलं. त्यामुळे रात्रभर घरात शोककळा पसरली होती. काहींनी भजन करत रात्र जागवली, पण त्या घरातला आनंद कायमचा हरपला होता.
सोमवारी सकाळी हैदराबादहून शोभाचे आई-वडील सोलापुरात पोहोचले. आपल्या लेकराचा मृतदेह पाहताच त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सुरुवातीला त्यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त करत सदर बाझार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी शोभाचा वाढदिवस
शोभा भंडारे हिचा सोमवारी वाढदिवस होता. आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा व्हावा अशी तिचीइच्छा होती. त्यासाठी तिने पतीकडे आग्रह धरला होता. विशेष म्हणजे पतीचा वाढदिवस देखील मागील महिन्यातच झाला होता. हा वाढदिवस मोठ्या उत्साहात करण्यात आला. ते दोघे देवदर्शनाला बाहेर गेले होते. तसाच वाढदिवस आपलाही व्हावा म्हणून ठेकेदाराकडून दोन हजार उचल घेऊन येण्यास तिने पतीला सांगितलं होत, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.






