TRENDING:

चक्क दोन्ही हातांनी लिहिणारा शिक्षक, कशी अवगत केली अनोखी कला?

Last Updated:

सोलापुरातील एका जिल्हा परिषदेच्या अवलिया शिक्षकाने त्याची प्रतिभा आणि कलेच्या जोरावर दखल घ्यायला भाग पाडलं आहे. या शिक्षकाचे नाव किरण बाबर असून ते दोन्ही हातांनी लिखाण करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर : समाजाला घडवणारा अतिशय महत्त्वाचा अंग म्हणून शिक्षकाकडे पाहिलं जातं. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा नकारार्थी आहे. मात्र, सोलापुरातील एका जिल्हा परिषदेच्या अवलिया शिक्षकाने त्याची प्रतिभा आणि कलेच्या जोरावर दखल घ्यायला भाग पाडलं आहे. या शिक्षकाचे नाव किरण बाबर असून ते दोन्ही हातांनी लिखाण करतात. त्यामुळे त्यांच्या या लिखाण कौशल्याचे सर्वच जण कौतुक करतात.

advertisement

सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी गावातील शिक्षक किरण बाबर यांच्या हातात दोन्ही हातानी लिहण्याची कला आहे. बऱ्याच लोकांना सरास उजव्या हाताने लिहीता येते. परंतु किरण बाबर हे दोन्ही हाताने लिखाण करतात. याबद्दल माहिती देताना किरण बाबर यांनी सांगितले की, थोड्याश्या सरावाने डाव्या हाताने लिहता येते. अक्षरांचे अवयव दोन्ही हाताने जर चांगले व्यवस्थित जर काढता आले. तर निश्चितच उजव्या हातानेच नव्हे तर डाव्या हाताने सुद्धा चांगल्या प्रकारे लिहिता येते. यासाठी लिखाणाचे जी काही नियम आहेत ते नियम जर माहीत झाले तर डाव्या हाताने सुद्धा लिहू शकतो.

advertisement

स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मॅनेजरची सोडली नोकरी; वडिलांच्या पाठींब्यानं सुरु केला कॅफे, पाहा Video

जिल्हापरिषद शाळेत माजी एकूण 26 वर्ष सेवा झाली आहे. सुरुवातीला अक्कलकोट तालुक्यातून झाली. त्यानंतर दक्षिण सोलापूर येथे मी शाळेत शिकवत होतो आणि आता सध्या मी गेली सहा वर्ष झाली हराळवाडी येथे कार्यरत आहे. डाव्या हाताने लिहिण्याचा विचार कोरोना काळात जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा आला. यामुळे घरात बसून वेळ कसा घालवावा यासाठी डाव्या हाताने लिहिण्याचा सराव सुरू केला.

advertisement

बापाचं छत्र हरवलं, जागा नसल्याने बाथरुममध्ये अभ्यास; पण उजमानं करुन दाखवलं!

सुरुवातीला डाव्या हाताने लिहिताना अक्षरे वेडी वाकडी येऊ लागली. पण माझ्या मनात जिद्द होती की मी डाव्या हाताने का लिहू शकत नाही. नंतर हळू हळू मला डाव्या हाताने लिहिणे जमू लागले. कळाले की, जसे आपण उजव्या हाताने लिहू शकतो तसेच डाव्या हाताने ही लिहू शकतो. त्यामुळे नंतर मला गोडी निर्माण झाली. आता जसा मला वेळ मिळेल तसा मी दिवसातून पंधरा मिनीट डाव्या हाताने लिहिण्याचा सराव करतो, अशी माहिती किरण बाबर यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
चक्क दोन्ही हातांनी लिहिणारा शिक्षक, कशी अवगत केली अनोखी कला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल