मध्य रेल्वेने गाडी क्रमांक 22226 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय 24 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार आहे. सोलापुरातून निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस ही दौंडला सकाळी 08:08 मिनिटाला पोहोचेल आणि 08:10 मिनिटाला प्रस्थान होईल.
Online Fraud: मायाने मेसेज केला, म्हणाली फक्त 3 तास काम करा; आमिशाला भुलला अन् आयुष्याची कमाई गमवली
advertisement
तर रात्री दौंड स्टेशनला 08:13 पोहोचेल आणि प्रस्थान 08:15 मिनिटाला होईल. हा निर्णय प्रवाशांच्या मागणीवरून घेण्यात आला असून यशस्वी ठरल्यास कायमस्वरूपी केला जाऊ शकतो. तर वंदे भारत एक्स्प्रेसच्या रचनेमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे ही अत्याधुनिक हाय स्पीड रेल्वे असून यामध्ये स्वयंचलित दरवाजे, एसी चेअर, वायफाय, यांसारख्या सुविधा या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये उपलब्ध आहेत. प्रवाशांनी नवीन थांबा सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले आहे.






