सोलापूर शहरातील मधला मारुती परिसरात ही घटना घडली. जोडभावी पेठ पोलिसांनी चोरट्याला जेरबंद केले असून त्याच्याकडून 15 हजार 800 रुपये जप्त करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दीपा शशिकांत औरंगाबादकर या उत्तर कसबा जुना विठ्ठल मंदिर परिसरात राहतात.
लाल किल्ला बॉम्बस्फोटावेळी तोतया IAS ‘कल्पना’ दिल्लीत, योगायोग की कटात सहभाग? धक्कादायक माहिती समोर
advertisement
दीपा यांचं मधला मारुती परिसरात फाटक्या नोटा बदलून देण्याचं दुकान आहे. दुकानासमोर नारळ विक्री करणाऱ्या कलावती हिरेमठ यांना सुट्टे पैसे देण्यासाठी गेले होते. सुट्टे पैसे देऊन येत असताना कलावती हिरेमठ यांनी सांगितले की तुमच्या दुकानात कोणीतरी शिरले आहे. त्यावेळी सुटे पैसे देऊन दुकानाकडे जात असताना दोन व्यक्ती दुकानाच्या बाहेर पळून जाताना दिसले.
दीपा औरंगाबादकर यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानामध्ये असलेल्या लोखंडी कपाटावर ठेवलेली काळ्या रंगाची बॅग दिसली नाही. त्याच बॅगेत फाटलेल्या 15 हजार रुपयांच्या नोटा होत्या. तसेच 800 रुपयांच्या चांगल्या नोटा देखील ठेवलेल्या होत्या. 26 नोव्हेंबर रोजी आरोपी सिनू हा सातशे ते आठशे रुपयांच्या फाटक्या नोटा बदलण्यासाठी दीपा यांच्याकडे घेऊन आला.
दीपा यांनी यातील नोटा आपल्याकडच्याच असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी सिनूकडे विचारणा केली. तेव्हा तो पळून जाऊ लागला. तेव्हा दीपा यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे नागरिकांनी आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सिनू गोपाल साखरे राहणार लक्ष्मी नगर बाळे यांनी दीपा औरंगाबादकर यांच्या दुकानातून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी सिनू साखरे आणि एका अनोळखीवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, जिथं चोरी केली तिथंच नोटा बदलायला गेल्याच्या या प्रकाराची चर्चा होतेय.






