सोलापुरातील 103 वर्षांचा ऐतिहासिक उड्डाणपूल पाडणार, रेल्वेकडून मेगाब्लॉकची तयारी, कधी?

Last Updated:

Solapur News: सोलापूरच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा 103 वर्षे जुना उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सोलापुरातील 103 वर्षांचा ऐतिहासिक उड्डाणपूल पाडणार, रेल्वेकडून मेगाब्लॉकची तयारी, कधी?
सोलापुरातील 103 वर्षांचा ऐतिहासिक उड्डाणपूल पाडणार, रेल्वेकडून मेगाब्लॉकची तयारी, कधी?
सोलापूर – सोलापूरच्या विकासाचा ऐतिहासिक साक्षीदार असणारा भैय्या चौकातील रेल्वे मार्गावर असणाऱ्या उड्डाणपुलाला 103 वर्षे झाली आहेत. 1922 मध्ये बांधण्यात आलेला हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने 14 डिसेंबर 2025 रोजी पाडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर मध्य रेल्वेने मेगाब्लॉकची तयारी केली आहे. कोणत्या गाड्या रद्द होणार आणि कोणत्या गाड्यांचे मार्ग बदलणार याबाबत रेल्वेचे सविस्तर निवेदन अद्याप आलेले नाही.
सोलापूर शहरातील भैय्या चौकात 1922 मध्ये रेल्वे मार्गावर हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. रेल्वे मार्गाबरोबरच मंगळवेढा, पंढरपूर आणि कोल्हापूरसह अन्य शहरांना जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. या उड्डाणपूलाला आता 103 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून प्रशासनाकडून हा पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी उच्चस्तरीय मंजुरी प्रक्रिया पूर्ण देखील झाली असून मंजुरीही मिळाली आहे.
advertisement
मेगाब्लॉकची तयारी
पुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉकची तयारी करण्यात आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून आतापर्यंत कोणकोणत्या गाड्या रद्द करण्यात आले आहे किंवा त्या गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेली आहे यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, मेगा ब्लॉक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून देण्यात आली आहे.
advertisement
वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचे नियोजन
प्रवाशांनी 14 डिसेंबर रोजी रेल्वेने प्रवास करण्याअगोदर गाड्यांची स्थिती पाहून तपासून घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हा फुल आधुनिक हायड्रोलिक, कटिंग मशीन व काँक्रीट क्रेशर च्या मदतीने जमीनदोस्त करण्यात येणार आहे. सोलापूरच्या जडणघडणीत या पुलाचे महत्त्वाचे योगदान आहे. नरसिंग गिरजी, लक्ष्मी विष्णू मिलाचे उत्पादने सोलापूर शहरातून साता समुद्रा पार पाठवण्यात या पुलाचे महत्त्वाचे योगदान राहिले आहेत. तसेच या पुलामुळे पंढरपूर, कोल्हापूर, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील अन्य शहर जोडले गेले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापुरातील 103 वर्षांचा ऐतिहासिक उड्डाणपूल पाडणार, रेल्वेकडून मेगाब्लॉकची तयारी, कधी?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement