पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे राहत असलेले भाविक पंढरपूर व अक्कलकोट येथील देवदर्शनासाठी आले होते. विठ्ठल-रुक्माईचे दर्शन घेऊन सोलापूरहून रेल्वेने जाण्यासाठी निघाले असताना मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील शरद नगर येथे ट्रक (क्रमांक MH46 BU 6651) जीप (क्रमांक MH 13 BN 7687) या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की जीप पलटी झाली. या अपघातामध्ये चार भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
मित्र करत होते बड्डे पार्टीची चर्चा, प्रशांतने वाढदिवसादिवशी स्वतःला संपवलं, सोलापुरातील घटना
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढून मंगळवेढ्यातील खाजगी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केले. या अपघातामध्ये 3 महिला व 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौघांवर मंगळवेढ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेजण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणेही अवघड झाले होते. मृत हे मुंबई येथील रहिवासी असून नातेवाईकांना पोलिसांनी कल्पना दिली आहे. ट्रक आणि क्रुझरचा अपघात झाल्याने पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोकाकुलता पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






