सोलापूर : सोलापूरच्या 13 वर्षांच्या चिमुकलीने रविवारी 11 ऑगस्ट रोजी सलग 10 तास 10 मिनिट 10 सेकंद लाठी फिरविण्याचा विक्रम केला. सृष्टी धानप्पा बिळीअंगडी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती स्वातंत्र्यसैनिक सिद्रामप्पा फुलारी प्रतिष्ठान, सोलापूर संचलित रूद्रशक्ती गुरुकलची विद्यार्थिनी आहे. तिच्या या विक्रमाची नोंद आता इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे.
advertisement
विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. सृष्टी बिळीअंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणे या पारंपरिक व ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करीत आहे.
रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसेच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन यांनी तिला मार्गदर्शन केले. 13 वर्षांच्या सृष्टीने आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय लाटीकाठीची स्पर्धा व त्याचबरोबर कराटे, योंगमुडो स्पर्धा खेळून विशेष प्राविण्य मिळवले आहे.
गायींच्या गोवऱ्यांतून भाऊ बहीण करतायेत लाखोंची उलाढाल, सोलापुरातील प्रेरणादायी कहाणी!
सध्या सृष्टीचा सलग लाठी फिरवण्याचा सराव लाठी सराव केंद्राच्या प्रशिक्षणस्थळी योगिनाथ फुलारे यांच्या उपस्थितीत सुरू होता. सद्यस्थितीला ती 11 तास सलग लाठी फिरवण्याचा सराव करीत होती. इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सांभाळत सोलापूरच्या नावलौकिकमध्ये भर घालणाऱ्या या चिमुकलीच्या विक्रमाची नोंद आता इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे.
पतीने दिली खंबीर साथ, पत्नीने सुरू केला व्यवसाय; अल्पावधीतच मिळवलं यश, ठाण्यातील प्रेरणादायी कहाणी!
महाराष्ट्र ही जिजाऊंच्या लेकी व छत्रपती शिवाजी महाराज, अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीतील मुली व महिला सक्षम व्हाव्यात, हा संदेश घेऊन शिवकालीन लाठी फिरविण्याच्या माध्यमाद्वारे सलग 10 तास 10 मिनिट 10 सेकंदाच्या विक्रमाला मला गवसणी घालता आली. हे पाहून अनेक मुली लाठी-काठी त्याचबरोबर शिवकालीन मर्दानी खेळाकडे आकर्षित होतील व नवीन पिढी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडेल, अशी प्रतिक्रिया सृष्टीनं यावेळी दिली.