मोहोळ तालुक्यात राहणारे उमेश कांबळे व सागर कांबळे हे दोन्ही भाऊ 2010 पासून सर्पमित्र म्हणून काम करत आहेत. ते दोघे जीवाचा धोका पत्करून नागरी वस्त्यांमध्ये आलेल्या सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडतात. आतापर्यंत दोघांनी मिळून 2 ते 3 हजारांपेक्षा जास्त सापांचा जीव वाचवला आहे. सापांना वाचवण्यासाठी अनेकदा उमेश आणि सागर कांबळे पोटाला दोरी बांधून विहिरीत आणि शेततळ्यांमध्ये देखील उतरतात.
advertisement
Tiger Day 2025: वाघ जगला तर जंगल टिकेल..., आज जागतिक व्याघ्र दिन, मेळघाटात वाघांची संख्या किती?
नागरिकांमध्ये सापांबद्दल असलेला गैरसमज दूर करण्याचं काम देखील हे भाऊ करत आहेत. साप म्हटलं की, आपण लगेच घाबरतो. मात्र, सर्वच साप माणसासाठी धोकादायक नसतात. जे बिनविषारी साप असतात ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत. पिकांना आणि धान्याला उंदीर किंवा इतर कीटकांपासून नुकसान होऊ नये, यासाठी बिनविषारी साप उपयुक्त ठरतात.
नागरिकांनी सजग व्हावे
सोलापूर जिल्ह्यात घोणस, मण्यार, मांजऱ्या आणि नाग हे चार जातीचे विषारी साप जास्त प्रमाणात आढळतात. तसेच कवड्या नाग, धामण, विरुळा हे बिनविषारी साप आहेत. नागरिकांनी विषारी सापांची माहिती घ्यावी. विषारी आणि बिनविषारी साप दिसायला कसे असतात, याची व्यवस्थित माहिती घेतली तर त्यांचा प्रकार ओळखण्यास मदत होईल. नागरी वस्तीमध्ये साप दिसल्यास त्वरित जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र उमेश कांबळे यांनी केलं आहे.