TRENDING:

Thane: 150 ट्रकमध्ये गणपतीच्या मूर्ती, कचऱ्यात होते ठेवणार, गावकऱ्यांनी रोखलं; ठाण्यातील घटनेचा संतापजनक VIDEO

Last Updated:

लहान गणेशमुर्ती समुद्रात न विसर्जित केलेल्या मूर्ती सकाळी डायघर येथील कचरा प्रकल्पाजवळ ढिगात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गुरूवारी संपूर्ण राज्यात मोठ्या आनंदाने दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. दरम्यान, मुंबईत लहान गणेशमुर्ती समुद्रात विसर्जित करण्यासाठी मनाई असल्यानं त्या महापालिकेकडे सोपवण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून या मूर्ती विसर्जित करण्यात येणार असल्याचं भाविकांना सांगण्यात आलं. मात्र या मूर्ती सकाळी डायघर येथील कचरा प्रकल्पा जवळ ढिगात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Thane: 150 ट्रकमध्ये गणपतीच्या मूर्ती, कचऱ्यात होते ठेवणार, गावकऱ्यांनी रोखलं; ठाण्यातील घटनेचा संतापजनक VIDEO
Thane: 150 ट्रकमध्ये गणपतीच्या मूर्ती, कचऱ्यात होते ठेवणार, गावकऱ्यांनी रोखलं; ठाण्यातील घटनेचा संतापजनक VIDEO
advertisement

रेल्वेच्या ग्रुप 'डी'च्या परीक्षा केव्हा होणार? असं कराल Hall ticket डाऊनलोड...

ग्रामस्थांना घडलेला प्रकार समाजातच ज्यांनी हे ट्रक आणले त्याला धारेवर धरलं आणि दिडशेपेक्षा जास्त डंपर मूर्त्यांसह तसेच परत न्यायला भाग पाडलं आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आणि ठाणे महापालिका हद्दतील डायघर गावातील डम्पिंग ग्राउंडवर आज पहाटे धक्कादायक प्रकार घडला. मुंबईतील दीड दिवसाच्या गणरायाच्या मुर्ती विसर्जन केलेल्या विल्हेवाटीसाठी दिडशे ट्रक भरून आणल्या होत्या. या अमानुष कृत्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत गाड्या परतवून लावल्या.

advertisement

5 गुंठ्यात केली मिरचीची लागवड, 45 दिवसात मिळालं 1 लाख उत्पन्न, कशी केली शेती?

या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे एक्स पोस्ट करत सत्ताधारी यांना सवाल उपस्थिती करत म्हणाले की, “स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकारच जर आपल्या आराध्य दैवत गणरायाचा अपमान करत असेल तर तो महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हायला हवेत. गणरायाचा अपमान करणाऱ्यांना जागेवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.” तर कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनीही संताप व्यक्त करून म्हटलं की, “गणपती बाप्पा हे महाराष्ट्राच्या घराघरात पूजले जाणारे आराध्य दैवत आहेत. विसर्जनानंतर मूर्तींचा अवमान हा धार्मिक भावनांचा अपमान आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. या असंवेदनशील शासनाचा विसर्जनाचा दिवस लांब नाही.”

advertisement

108 किलो चांदीचा गणपतीला 2,00,00,000 रुपयांचं सोनं; मुंबईकरांवर जालनेकर ठरले भारी

दरम्यान,स्थानिक राहिवाशांनी सांगितले की हिंदूंच्या सरकारची ही भूमिका बघून वेदना होतायत. संबंधित मुंबई आणि ठाणे महापालिका अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते ते पहावे लागेल....

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane: 150 ट्रकमध्ये गणपतीच्या मूर्ती, कचऱ्यात होते ठेवणार, गावकऱ्यांनी रोखलं; ठाण्यातील घटनेचा संतापजनक VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल