TRENDING:

7 महिन्यांच्या चिमुकलीला दुर्मिळ आजार, काळजाच्या तुकड्यासाठी आजोबानं जीवही पणाला लावला...

Last Updated:

Thane News: ठाण्यातील अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकलीला तिच्या आजोबांनी जीवनदान दिलंय. अत्यंत दुर्मिळ आजाराने ग्रस्त चिमुकलीवर नुकतेच गुंतागुंतीची यकृताची शस्त्रक्रिया झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकलीला तिच्या आजोबांनी जीवदान दिलेय. नुकतेच ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची यकृताची शस्त्रक्रिया पार पडली. यात सात महिन्यांच्या मायराला (नाव बदलले आहे) तिच्या 59 वर्षीय आजोबांनी यकृतदान करून जीवदान दिले. एका अत्यंत गुंतागुंतीच्या व दुर्मिळ अशा यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून मायराला पुनर्जन्म मिळाला असून सध्या ती आणि तिचे आजोबा दोघेही पूर्णपणे ठणठणीत आहेत.
सात महिन्यांच्या चिमुकलीला दुर्मिळ आजार, नातीसाठी आजोंबाचं यकृतदान..., असा वाचवला जीव!
सात महिन्यांच्या चिमुकलीला दुर्मिळ आजार, नातीसाठी आजोंबाचं यकृतदान..., असा वाचवला जीव!
advertisement

मायरा ‘बिलीयरी अ‍ॅट्रेसिया’ या दुर्मिळ आणि गंभीर यकृतविकाराने त्रस्त होती. पाच महिन्यांची असताना तिला कावीळ झाल्यानंतर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत तिच्या यकृताचा आकार मोठा झाल्याचे दिसून आले आणि ‘मायटोकॉन्ड्रियल ट्रायफंक्शन प्रोटीन डेफिशियन्सी’ या दुर्मिळ जनुकीय आजाराचे निदान झाले. जन्मानंतर पहिल्या 100 दिवसांत हा आजार निदान झाल्यास शस्त्रक्रियेने उपचार शक्य होतो. परंतु मायराच्या बाबतीत ते शक्य नसल्याने यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता.

advertisement

PMPML महिला कंडक्टरचा धक्कादायक प्रताप! तिघांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून केलं भयंकर कृत्य; नेमकं घडलं काय?

मायराच्या 59 वर्षीय आजोबांनी पुढे येत आपले यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. तपासणीत त्यांचे यकृत मायरासाठी योग्य असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यारोपणाच्या वेळेस मायराची तब्येत गंभीर झाली होती. पोटात पाणी साचणे, रक्त न गुठळण्याची लक्षणे दिसून येत होती. बालकांचे यकृत हे त्यांच्या एकूण वजनाच्या केवळ 4–5 टक्के असते. त्यामुळे प्रौढ व्यक्तीच्या यकृतातील छोटा भागही तांत्रिकदृष्ट्या रोवताना अनेक अडचणी येतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

डॉक्टरांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर मायराची प्रकृती हळूहळू सुधारली असून ती आता नियमित आहार घेत आहे. तिचे वजनही वाढले असून दोघांचीही प्रकृती चांगली आहे, अशी माहिती रुग्णालयातील लिव्हर ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख डॉ. आनंद राममूर्ती यांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
7 महिन्यांच्या चिमुकलीला दुर्मिळ आजार, काळजाच्या तुकड्यासाठी आजोबानं जीवही पणाला लावला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल