Pune Crime : PMPML महिला कंडक्टरचा धक्कादायक प्रताप! तिघांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून केलं भयंकर कृत्य; नेमकं घडलं काय?

Last Updated:

PMPML News : पुण्यातील पीएमपीएमएलमधील महिला कंडक्टरने हनीट्रॅपच्या माध्यमातून तिघा कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

News18
News18
पुणे : गेल्या काही वर्षांत पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कुठे सायबर क्राईम तर कुठे खून खराब्याच्या घटना घडत आहेत. अशातच पुण्यात आता एक वेगळ्याच प्रकारचा गुन्हा समोर आला आहे. ज्यात हनीट्रॅपच्या माध्यमातून एका महिला कंडक्टरने वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
जाणून घ्या नेमक घडलं काय?
हे प्रकरण आहे पुणे शहरात असलेल्या पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारातील. जिथे एका महिला कंडक्टरने आर्थिक फायद्यासाठी स्वत:च्या शरीराचा वापर करुन तीन व्यक्तींची फसवणूक केली आहे. वारंवार ती या गोष्टीचा फायदा घेत वेळोवेळी त्यांच्याकडून मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम उकळली.
अखेर महिलेविरोद्धात गुन्हा दाखल...
पुण्यातील या घटनेप्रकरणी गेल्या महिन्यात 17 सप्टेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात महिला कंडक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देणे तसेच खंडणीची मागणी करणे याशिवाय पीडित व्यक्तींविरोधात पोलिसांकडे बनावट तक्रार दाखल करण्याचे आरोप आहेत. सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
पोलिसांनी अखेर महिलेला अटक केली. हनीट्रॅपच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर पीएमपी महामंडळ प्रशासनाने चौकशीसाठी संबंधित महिलेला निलंबित केले आहे. या संदर्भात पीएमपीएमएल प्रशासनाने निलंबनाचे पत्र जारी केले आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : PMPML महिला कंडक्टरचा धक्कादायक प्रताप! तिघांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून केलं भयंकर कृत्य; नेमकं घडलं काय?
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement