TRENDING:

पावसात फिरायला जायचा प्लॅन करताय? मुंबईजवळच्या 'या' पर्यटनस्थळी मनाई!

Last Updated:

या दिवसांत वाटा निसरड्या झालेल्या असतात, पाण्याचा प्रवाह वाढलेला असतो, झाडाझुडूपांमध्ये विषारी प्राण्यांचा सुळसुळाट असतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता प्रचंड असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
पर्यटकांनीही आपापली काळजी घ्यायला हवी.
पर्यटकांनीही आपापली काळजी घ्यायला हवी.
advertisement

ठाणे : पावसाळा सुरू होऊन अजून एक महिनाही झाला नाही, तर पावसाळी पर्यटनाबाबत दुर्घटना समोर आल्या. पुण्याच्या भुशी डॅम परिसरात धबधब्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले, या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केलं. त्यानंतर आता विविध ठिकाणी पर्यटकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलाय, तर धोकादायक पर्यटनस्थळं बंदच ठेवण्यात आली आहे. आता ठाणे प्रशासनानंही याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

advertisement

ठाणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर जिल्हा प्रशासनानं मनाईचा आदेश लागू केला आहे. पावसाळ्यात अल्हाददायक असं गार वातावरण असतं, निसर्गानं जणू हिरवी शाल पांघरल्याप्रमाणे सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते. याच निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण मोठ्या प्रमाणावर पावसाळी पर्यटन करतात. परंतु या दिवसांत वाटा निसरड्या झालेल्या असतात, पाण्याचा प्रवाह वाढलेला असतो, झाडाझुडूपांमध्ये विषारी प्राण्यांचा सुळसुळाट असतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता प्रचंड असते. म्हणूनच पर्यटकांनीही आपापली काळजी घ्यायला हवी.

advertisement

Pune News: पर्यटकांसाठी 'हा' सुप्रसिद्ध धबधबा बंद! नियम मोडल्यास होईल कारवाई

ठाणे जिल्ह्यात कुठं जाण्यास मनाई?

  • अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा, आंबेशिव नदी, असनोली नदी, बारवी नदी, भोज, दहिवली.
  • कल्याण तालुक्यातील कांबा, गणेश घाट, टिटवाळा नदी.
  • भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी आणि इतर धबधब्याचा परिसर
  • शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर, माहुली किल्ला आणि पायथा, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट.
  • advertisement

  • मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, खडवली नदी, गणेश घाट, हरिश्चंद्रगड, बारवी धरण, नाणेघाट, गोरखगड, माळशेज घाट, पडाळे धरण

वरील सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटना थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सीआरपीसी कलम 144 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या कलम 34 अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. जे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत, त्यामुळे त्यांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अंबरनाथचे तहसीलदार प्रशांत माने यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
पावसात फिरायला जायचा प्लॅन करताय? मुंबईजवळच्या 'या' पर्यटनस्थळी मनाई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल