डोंबिवली स्टेशनजवळ सुरु असलेल्या रेनबो सेलमध्ये या वस्तू स्वस्त दरात मिळत आहेत. अगदी 50 रुपयांपासून घरगुती वापरासाठी वस्तू इथं मिळतात. त्यामुळे त्याच्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी आहे.
स्वस्तात भांडी खरेदी करायचीय? या मार्केटला द्या भेट
त्याचबरोबर या सेलमध्ये कपडे, चादरी, पडदे, ज्वेलरी, किचनमधील लहान-मोठ्या वस्तू, लोणची, मसाले, पापड , बिस्किटे, वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास या सारख्या अनेक वस्तू आहेत. महिलांच्या कुडत्यांची किंमत येथे 200 रुपयांपासून सुरू होते. तर पुरुषांचे कॉटनचे शर्ट 350 रुपयाला मिळत आहेत.
advertisement
घरगुती वस्तू आणि कपड्यांप्रमाणेच ज्वेलरीही या सेलमध्ये कमी किंमतीत मिळते. मंगळसूत्र, कानातले, हार, विविध डीझाईनचे नेकलेस येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे मंगळागौरी किंवा अन्य सणांना साडीवर घालण्यासाठी चांगले पर्याय तुम्हाला इथं मिळू शकतात.
भाऊरायाला द्या पालक, काकडी, तुळशीच्या बिया; राखीचा असा वापर कुणीच केला नसेल!
मोदक बनवण्यासाठी यंत्र
मोदक बनवण्यासाठी एक नवीन यंत्र आला आसुन हे फक्त 100 रुपयाला आहे अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. विशेष म्हणजे या यंत्रामुळे महिलांना मोदकाला आकार देण्यासाठी आता कष्ट घ्यावे लागणार नसल्याचे विक्रेते सांगतात. याचबरोबर ताक किंवा कॉफी बनवण्यासाठी एक सेलवर चालणारे यंत्र देखील येथे उपलब्ध आहे. हा सेल डोंबिवली स्थानकाजवळ असून दिवाळीपर्यंत सुरू राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.





