Thane News: ‘नो एन्ट्री’चा निर्णय रद्द, पावसामुळे घोडबंदर मार्ग अवजड वाहनांसाठी पुन्हा खुला!
टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील या कामामुळे मंगळवारी वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करता येणार नाही. परिणामी, मंगळवारी, 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असा एकूण 7 तास पाणीपुरवठा बंद राहील. महानगरपालिकेच्या मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण ग्रामिण विभागातील मांडा - टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावांना पाणीपुरवठा होतो. तसेच ब प्रभाग क्षेत्रातील मिलिंद नगर, योगिधाम, चिकनघर, बिर्ला कॉलेज, मुरबाड रोड परिसर आणि डोंबिवली (पूर्व आणि पश्चिम) परिसरास होणारा पाणी पुरवठा बंद राहील.
advertisement
दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात दुरुस्ती कामासाठी मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करुन ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.