TRENDING:

Kalyan News : KDMC कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महापालिकेकडून बोनस जाहीर, किती मिळणार रक्कम?

Last Updated:

KDMC Bonus : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 6500 कर्मचाऱ्यांची दिवाळी आता अधिक गोड होणार आहे. महापालिकेकडून कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगर पालिका नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहते. यंदा पुन्हा एकदा ही महापालिका चर्चेचा विषय ठरली आहे, कारण यातील ६५०० कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गोड होणार आहे. केडीएमसी प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
News18
News18
advertisement

अनेक दिवसांच्या मागणीला अखेर यश; कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात

महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी अनेक दिवसांपासून बाकी होती. अखेर जाऊन या मागण्यांना मान्यता देत आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला वीस हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका, परिवहन कर्मचारी आणि शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

बोनसची प्रतीक्षा संपली! तब्बल 20 हजार रुपये मिळणार

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार आहे. मात्र, यंदा कर्मचारी संघटनांनी 25 हजार रुपयांचा बोनस देण्याची मागणी केली होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत परिवहन कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील आणि आयुक्त गोयल यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेत आर्थिक परिस्थिती लक्षात घेता 25 हजारांचा बोनस शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तरीही कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन मागील वर्षाच्या तुलनेत 500 रुपयांची वाढ करून बोनस रक्कम 20 हजार करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 19,500 रुपयांचा बोनस देण्यात आला होता.

advertisement

अध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान म्हणून बोनस जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण अधिक आनंददायी होणार आहे.

बोनस चर्चेबरोबरच संघटनेने शहरातील इतर महत्त्वाच्या विषयांवरही आयुक्तांशी चर्चा केली. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वेळेवर न उचलला जाणारा कचरा, फूटपाथवरील अतिक्रमण, तसेच रस्ते प्रकल्पातील बाधितांना घरे देण्याच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. पाटील यांनी सांगितले की अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी विकासकामे संथ गतीने सुरू आहेत.

advertisement

याशिवाय बीएसयूपी प्रकल्पातील घरे सुस्थितीत करून ती रस्ते प्रकल्पातील बाधितांना देण्यात यावीत, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली. तसेच स्टेशन परिसरातील विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली, कारण कामांच्या संथ गतीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

या सर्व मुद्द्यांवर आयुक्त अभिनव गोयल यांनी संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे केडीएमसी कर्मचाऱ्यांना बोनससह शहरातील सुविधा आणि विकास कामांबाबत काही सकारात्मक बदल दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच, कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या निर्णयामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांसाठीही सुधारित सेवा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan News : KDMC कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महापालिकेकडून बोनस जाहीर, किती मिळणार रक्कम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल