शासकीय वाहने सुसाट
नवी मुंबईत महापालिका, सिडको आणि एमआयडीसी हे तीन प्रमुख शासकीय प्राधिकरणांची कार्यालये आहेत. कार्यालयांतील अधिकाऱ्यांसाठी बाह्य संस्थेच्या माध्यमातून वाहने पुरविली जातात. खासगी वाहतूक संस्थेने पुरविली बहुतांशी वाहने 15 वर्षे जुनी असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांतील अर्थपूर्ण व्यवहारामुळे ही वाहने सुसाट धावताना दिसत असल्याचं सांगण्यात येतंय.
advertisement
BH Series: तुम्हीही घेऊ शकता ‘बीएच’ सिरीजचा नंबर, एकदा घ्या अन् देशात कुठेही फिरा, टेन्शनच नाही!
भंगार वाहने रस्त्यावर
नवी मुंबई शहराच्या बहुतांशी रस्त्यांवर जुन्या आणि मोडकळीस आलेल्या वाहनांची बेकायदा पार्किंग दिसून येतेय. वर्षानुवर्षे एकाच जागेवर पडून असलेल्या या भंगार वाहनांचा वाहतुकीबरोबरच दैनंदिन साफसफाईला देखील अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून अशा वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी संबंधित विभागांकडून विशेष मोहीम राबविली जात असून, कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे नवी मुंबईत रस्त्यावर दिसणाऱ्या 15 वर्षे जुन्या वाहनांवर आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांना वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार असून वाहने स्क्रॅप म्हणजेच भंगारात काढावी लागणार आहेत.






