TRENDING:

Diwali Shopping Kalyan Market : स्वस्त, मस्त आणि 'कल्याण'कारी पणत्या! दिवाळी खास करणाऱ्या कुंभारवाड्याची गोष्ट

Last Updated:

kalyan : तुम्हीही कल्याण शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी जात आहात आणि तुम्हालाही स्वस्त आणि आकर्षक सजावटीच्या वस्तु तसेच पणत्या पाहिजे असल्यास तुम्ही या शहरातील कुंभारवाड्यात नक्कीच जावा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : दिवाळी हा सण म्हटला की सर्वात आधी आठवतात त्या म्हणजे रंगीबेरंगी पणत्या, कंदील, फुलबाज्या आणि गोडधोड पदार्थ. या सणाची खरी सुरुवात होते ती घराच्या सजावटीपासून आणि त्या सजावटीचा सर्वात सुंदर भाग म्हणजे रंगीबेरंगी दिवे आणि पणत्या. दिवाळीच्या काही दिवस आधीच बाजारपेठांमध्ये महिलांची गजबज वाढते. पण कल्याण शहरातील कुंभारवाडा हा या सगळ्या गजबजेमध्ये एक वेगळं स्थान निर्माण करतो.
News18
News18
advertisement

कुंभारवाड्याची ओळख

कल्याणच्या मध्यवर्ती भागात असलेला कुंभारवाडा हा अनेक दशकांपासून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या बहुतांश घरांमध्ये अजूनही कुंभारकामाची परंपरा जपली गेली आहे. मातीपासून तयार होणारे दिवे, पणत्या,हांड,गणपतीच्या मूर्ती अशा अनेक वस्तू येथे बनवल्या जातात. मात्र दिवाळीच्या दिवसात इथली ओळख एकाच गोष्टीशी घट्ट जोडली जाते ती म्हणजे दिवे आणि पणत्या.

advertisement

विविध आकार आणि डिझाईन्स

कुंभारवाड्यात गेल्यावर अगदी पारंपरिक साध्या मातीच्या पणत्यांपासून ते रंगीत रंगांनी सजवलेल्या आकर्षक डिझाईनच्या पणत्यांपर्यंत सर्व काही पाहायला मिळते. काही पणत्या अगदी फुलांच्या आकारात, तर काहींवर आरासदार मणी तसेच ग्लिटर लावलेले असतात. लहान पणत्यांपासून मोठ्या पणत्यांपर्यंत सगळं काही उपलब्ध आहे. काही विक्रेते थीम बेस्ड दिवे तयार करतात. जसे की लक्ष्मी-गणपती कोरीवकाम असलेले दिवे, मोर किंवा कमळाच्या आकाराचे दिवे वगैरे.

advertisement

किंमती आणि वाजवी दर

कुंभारवाड्यातील पणत्यांच्या किंमती इतर बाजारपेठांच्या तुलनेत खूपच वाजवी असतात. साध्या मातीच्या पणत्या 5 ते ६ रुपयांपर्यंत मिळतात, तर रंगीत आणि डिझायनर पणत्या 10 ते 50 रुपयांपर्यंत असतात. मोठ्या सजावटीच्या दिव्यांची किंमत 100 रुपयांपासून सुरू होऊन 300 ते 500 रुपयांपर्यंत जाते. दरवर्षीच्या मागणीप्रमाणे काही दुकाने खास सेटमध्ये पणत्या विकतात जसे की 12 पणत्यांचा सेट 100 रुपयांना किंवा 24 पणत्यांचा सेट 200 रुपयांना.

advertisement

कुंभारांची मेहनत

या सर्व वस्तूंच्या मागे असते इथल्या स्थानिक कुंभारांची अपार मेहनत. दिवाळीच्या दोन महिने आधीपासूनच ते तयारीला लागतात. माती मळणे, साच्यातून आकार देणे, वाळवणे आणि रंगकाम प्रत्येक टप्प्यात कला आणि कौशल्याची झलक दिसते. पावसाळा संपताच या कामांना गती येते. अनेक वेळा संपूर्ण कुटुंब मिळून दिवे बनवतात आणि त्यामुळे ही परंपरा पिढ्यान् पिढ्या चालू राहिली आहे.

advertisement

कसे पोहचाल कुंभारवाड्यात?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत लक्ष्मीपूजनला या चुका टाळा! अन्यथा आयुष्यभर पस्तवाल, गुरुजींनी सांगितलं
सर्व पहा

कल्याण रेल्वे स्टेशनपासून कुंभारवाडा अगदी 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. स्टेशनच्या पूर्व बाजूने बाहेर पडल्यावर रिक्षा किंवा बसने थेट कुंभारवाडा येथे पोहचता येते. दिवाळीच्या काळात येथे वाहनांची गर्दी असते त्यामुळे शक्य असल्यास पायी जाणं अधिक सोयीचं ठरतं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Diwali Shopping Kalyan Market : स्वस्त, मस्त आणि 'कल्याण'कारी पणत्या! दिवाळी खास करणाऱ्या कुंभारवाड्याची गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल