ठाणे: ठाण्यात एसटी कर्मचाऱ्यांवर दिवाळीआधीच संक्रांत ओढवलीये. आरटीओच्या एका निर्णयामुळे 170 कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लागलीये. त्यामुळे ठाणे आगारातील डेपो नंबर 1 मधील कर्मचाऱ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असून एसटी बस चालकांनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना साकडं घातलंय.
नेमकं घडलं काय?
एसटी बसची दुरावस्था हा नेहमीचाच प्रश्न आहे. परंतु, ठाण्यातील अशाच बिघडलेल्या गाड्यांमुळे एसटीचालकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड, स्पीडो मीटर नादुरुस्त या मुळे मुंबई-पुणे हायवेवर स्पिडलिमिट बाबत चालकांना अंदाज येत नाही. परंतु, या प्रकरणी आरटीओने विविध प्रकरणांमध्ये चलन केले असूनते कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल केले आहे. त्यामुळे बस चालकांमध्ये कमालीची नाराजी आहे.
advertisement
Mumbai Local: मुंबई लोकलचा 4 दिवस खोळंबा! कर्जतहून खोपोली, नेरळ सर्व ट्रेन बंद, हाल निश्चित!
ठाणे आगारातील डेपो नंबर 1 मध्ये काम करणाऱ्या 70 कर्मचाऱ्यांना आरटीओच्या निर्णयाचा फटका बसला आहे. आरोटीओने केलेले चलन त्यांच्या वेतनातून वसूल करण्यात आले आहे. प्रत्येकी 4 हजार 12 रुपये वेतनातून वसूल करण्यात आले आहेत. तर तब्बल 8 हजार 24 रुपये थकीत असल्याचे वेतन पत्रिकेत नमूद करण्यात आलंय. हा दंड एसटी नादुरुस्त असल्याने चाकलांच्या माथ्यावर मारण्यात आला आहे. त्यामुळे एसटी चालकांमध्ये नाराजी असून त्यांनी याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्ष घालावे अशी मागणी केलीये.