Mumbai Local: मुंबई लोकलचा 4 दिवस खोळंबा! कर्जतहून खोपोली, नेरळ सर्व ट्रेन बंद, हाल निश्चित!

Last Updated:

Mumbai Local: दिवाळीच्या आधीच्या वीकेंडलाच मुंबईकरांचा खोळंबा होणार आहे. 30 तासांसाठी लोकल सेवा ठप्प राहणार असल्याने मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Mumbai Local: मुंबईकरांचा 4 दिवस खोळंबा! कर्जतहून खोपोली, नेरळ सर्व ट्रेन बंद, हाल निश्चित!
Mumbai Local: मुंबईकरांचा 4 दिवस खोळंबा! कर्जतहून खोपोली, नेरळ सर्व ट्रेन बंद, हाल निश्चित!
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून वीकेंडलाच लोकल खोळंबा करणार आहे. मध्य रेल्वे शनिवारी, 11 ऑक्टोबरपासून 30 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. कर्जतहून नेरळ आणि खोपोलीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व लोकल बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळी आधीच्या वीकेंडला खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार आहेत.
30 तासांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने कर्जत यार्डमध्ये पुनर्बांधणीसह आधुनिक सिग्नल प्रणालीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे शनिवारी, 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.20 ते रविवारी, 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.20 वाजेपर्यंत 30 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या काळात कर्जत ते नेरळ आणि कर्जत ते खोपोली सर्व ट्रेन बंद राहणार आहेत.
दरम्यान, कर्जतहून नेरळ आणि खोपोली लोकल सेवा बंद राहणार असली तरी ब्लॉक दरम्यान नेरळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकल सेवा सुरु राहील.
advertisement
4 दिवस खोळंबा
शनिवारी, 11 ऑक्टोबर रोजी ब्लॉक पूर्वी शेवटची लोकल कर्जत ते CSMT सकाळी 11:19 ला कर्जतहून सुटेल. त्यानंतर या मार्गावरील लोकसेवा बंद होईल.
रविवारी, 12 ऑक्टोबर रोजी ब्लॉक नंतरची पहिली लोकल कर्जत ते CSMT संध्याकाळी 7.43 ला कर्जत हून सुटेल.
advertisement
सोमवारी, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.20 पासून दुपारी 02.20 पर्यंत 3 तासांचा मेगाब्लॉक असल्यामुळे या दरम्यान सर्व ट्रेन बंद राहतील.
मंगळवारी, 14 ऑक्टोबर रोजी पुन्हा सकाळी 11.20 पासून दुपारी 02.20 पर्यंत 3 तासाचा मेगा ब्लॉक असल्यामुळे या दरम्यान देखील सर्व ट्रेन बंद राहतील.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबई लोकलचा 4 दिवस खोळंबा! कर्जतहून खोपोली, नेरळ सर्व ट्रेन बंद, हाल निश्चित!
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement