क्रिकेटर व्हायचं स्वप्न, पण बनला बॉडीबिल्डर, एका सर्जरीनं आयुष्य संपलं; मिस्टर इंडिया वरिंदर घुम्मणची Inside Story

Last Updated:
Varinder Ghuman Death : एका सर्जरीचं निमित्त झालं आणि फेमस बॉडीबिल्डर वरिंदर घुम्मणचं निधन झालं. कधीकाळी क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहणारा वरिंदर बॉडीबिल्डिंग क्षेत्रात कसा आला? त्याने सलमानसोबतची सिनेमात काम केलं. त्याची इनसाइड स्टोरी पाहूयात.
1/10
पंजाबचा प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर घुम्मण यांचं वयाच्या 43 व्या वर्षी निधन झालं. शस्त्रक्रियेदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घुम्मण याला भारतातील सर्वात प्रसिद्ध शाकाहारी बॉडीबिल्डर म्हणून ओळखलं जातं.

advertisement
2/10
शाळेत शिकत असताना त्याने क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण नशीबानं त्याला बॉडी बिल्डर बनवलं.  तो शाळेत असताना शाळेच्या टीममध्ये फास्ट बॉलर म्हणून खेळखला जात होता.  मात्र त्याच्या वडिलांनी त्यांना पोलिसात भरती होण्यासाठी अ‍ॅथलेटिक्सकडे वळवलं. नियतीने त्यांच्यासाठी वेगळी वाट निवडली आणि ते अखेर तो बॉडीबिल्डर बनला.

3/10
वरिंदर घुम्मण याची उंची 6.2 फूट आणि वजन सुमारे 140 किलो होतं. त्यांच्या दमदार शरीरयष्टीमुळे त्याला The He-Man of India असं नाव मिळालं. त्याने  2009 मध्ये Mr. India गा किताब जिंकला आणि Mr. Asia स्पर्धेत दुसरं स्थान मिळवलं.

4/10
घुम्मण याने केवळ बॉडीबिल्डिंगच नाही तर चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं. त्यांनी पंजाबी चित्रपटांबरोबरच सलमान खानसोबत टायगर 3 या बॉलिवूड चित्रपटात काम केलं.

5/10
चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांनी मुंबईत  डान्स आणि एक्टिंग कोर्स पूर्ण केला. त्याने हनुमान आणि भीम सेन यांच्या भूमिका रंगमंचावर साकारल्या. इतकंच नाही तर त्याने स्वत:चा डेरी बिझनेस सुरू करून त्यातही यश मिळवलं होतं. 

6/10
वरिंदर घुम्मणचा जन्म 28 डिसेंबर 1982 रोजी गुरुदासपूर जिल्ह्यातील तलवंडी गावात झाला. नंतर त्यांचं कुटुंब जालंधरला गेलं. त्याने लयलपूर खालसा कॉलेजमधून MBA केलं.

7/10
वरिंदरच्या मृत्यूपश्चात त्याची पत्नी, एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. त्याचे वडील भूपेंद्र सिंग हे पंजाब पोलिसात ASI म्हणून कार्यरत होते आणि आई हरभजन कौर यांचं 2009 मध्ये निधन झालं. वरिंदरच्या वडिलांना कबड्डी आणि आजोबांना हॉकी या खेळाची आवड होती.

8/10
वरिंदरला टॅटू आणि लग्झरी कार्सची यांची आवड होती. त्याच्या उजव्या हातावर सापाचा टॅटू आणि डाव्या हाताच्या बोटावर ओमकारचा टॅटू होता. तो स्पर्धा जिंकल्यावर हे टॅटू अभिमानाने दाखवायचा.

9/10
वरिंदरकडे जबरदस्त कार कलेक्शन आहे. ज्यात Toyota Fortuner, Chevrolet Cruze, Hyundai Verna, Range Rover सारख्या गाड्यांचा समावेश आहे.  Harley Davidson मोटरसायकलही त्याच्याकडे होती.

10/10
2005 मध्ये वरिंदर घुम्मणनी पहिल्यांदा जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून Mr. Jalandhar हा किताब पटकावला. त्याच वर्षी त्याने मिस्टर पंजाब पदवी मिळवली. केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने भारताचं नाव उंचावलं.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement