Central Railway: दिवाळीआधी रेल्वेचा खोळंबा, शनिवारी पुणे – मुंबई वाहतूक ठप्प, 19 तासांचा मेगाब्लॉक!
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Central Railway: मध्य रेल्वेवरून पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी या मार्गावरील पाच एक्स्प्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे खालील पाच प्रमुख एक्स्प्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत:
मुंबई: पुणे ते मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्जत यार्डमध्ये पुनर्बांधणीसह आधुनिक सिग्नल प्रणालीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने 12 ऑक्टोबर (शनिवार) रोजी पळसदरी ते भिवपुरी दरम्यान 19 तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवार दुपारी 12.20 वाजता सुरू होऊन रविवारी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.20 वाजेपर्यंत राहणार आहे. या दरम्यान अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून काही गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत.
या ब्लॉकमुळे खालील पाच प्रमुख एक्स्प्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
- गाडी क्रमांक 12125/26 प्रगती एक्स्प्रेस (CSMT-पुणे-CSMT)
- 12123/24 डेक्कन क्वीन (CSMT-पुणे-CSMT)
- 11008 डेक्कन एक्स्प्रेस (पुणे-CSMT)
- 12128 इंटरसिटी एक्स्प्रेस (पुणे-CSMT)
- 22106 इंद्रायणी एक्स्प्रेस (पुणे-CSMT)
तसेच, गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर-CSMT कोयना एक्स्प्रेस आणि 11302 बेंगळुरू-CSMT एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या फक्त पुणे स्थानकापर्यंतच धावतील. पुणे ते मुंबईदरम्यान या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
याव्यतिरिक्त नऊ मेल/एक्स्प्रेस गाड्यांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. प्रवाशांनी आपल्या गाडीच्या मार्गात बदल झाला आहे का? याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानकांवर माहिती घ्यावी.
पाच लोकल रद्द
ब्लॉकदरम्यान फक्त एक्स्प्रेसच नव्हे तर पाच लोकल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा त्रास होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेकडून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा विचार करून प्रवासाची पूर्वतयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 10, 2025 10:15 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway: दिवाळीआधी रेल्वेचा खोळंबा, शनिवारी पुणे – मुंबई वाहतूक ठप्प, 19 तासांचा मेगाब्लॉक!









