ICC च्या इशाऱ्यानंतरही पाकडे सुधरेना! Sahibzada Farhan ने पुन्हा केली AK 47 ची अॅक्शन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sahibzada Farhan AK 47 Action : साहिबजादा फरहानने अलिकडेच झालेल्या प्रमोशनल शूट दरम्यान पुन्हा असंच काही करून वाद पुन्हा निर्माण केला. शूटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sahibzada Farhan AK 47 Action : आशिय कपच्या सुपर फोरच्या सामन्यात भारताविरूद्ध पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान याने अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने AK 47 चं सेलिब्रेशन केलं होतं. पाकिस्तानी खेळाडूंचं हे सेलिब्रेशन प्रचंड वादात सापडलं होतं. बीसीसीआयने देखील या प्रकरणी आयसीसीकडे तक्रार केली होती. य तक्रारीनंतर फरहानला वॉर्निंग देण्यात आली होती. त्यासोबत एक डीमेरीट पॉईंट देखील दिला होता. मात्र, आयसीसीच्या वॉर्निंगनंतर देखील पाकिस्तान सुधारल्याचं पहायला मिळत नाही.
शूटमधील फोटो व्हायरल
साहिबजादा फरहानने अलिकडेच झालेल्या प्रमोशनल शूट दरम्यान पुन्हा असंच काही करून वाद पुन्हा निर्माण केला. शूटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता सोशल मीडियावर फरहानवर जोरदार टीका होत आहे आणि भारतीय चाहत्यांनी त्याला फटकारलं आहे. मात्र, पाकिस्तानला खोड अजून मोडली नाही, हे या निमित्ताने स्पष्ट झालं आहे.
advertisement
Sahibzada Farhan's Instagram Post SahibzadaFarhan #CAbat pic.twitter.com/G8eL9Ep92u
— CricFollow (@CricFollow56) October 8, 2025
पाकिस्तानी खेळाडू भारतासमोर ढिल्ले
साहिबजादा फरहान हा एकमेव खेळाडू होता, ज्याने भारताविरुद्ध टक्कर देण्याचा प्रयत्न केला. बाकी पाकिस्तानी खेळाडू भारतासमोर ढिल्ले दिसले होते. साहिबजादा फरहान याने आक्रमक फलंदाजी करत प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या फिरकीसमोर त्याचं काहीही चाललं नव्हतं.
advertisement
हॅरीस रौफला देखील दंड
दरम्यान, आशिया कपमध्ये फरहानसोबत हॅरीस रौफने देखील मैदानात वादग्रस्त अॅक्शन केली होती. या अॅक्शन नंतर आयसीसीने रौफला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावला होता. त्यासोबत एक डिमेरीट पॉइंटही दिला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 11:01 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ICC च्या इशाऱ्यानंतरही पाकडे सुधरेना! Sahibzada Farhan ने पुन्हा केली AK 47 ची अॅक्शन