महापालिकेने या कालावधीत पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन करून 24 तासांऐवजी केवळ 12 तासच पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहराला दररोज शहराला 616 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरणाकडून 114 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर पाणी मिळते. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा 2 मे सकाळी 9 ते 3 मे सकाळी 9 पर्यंत बंद राहील.
advertisement
पाणी बंद असलेल्या भागांची यादी
या पाणीपुरवठा बंद असल्यामुळे, शुक्रवार, 2 मे, 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत ठाणे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. तसेच, रात्री 9 ते 3 मे, 2025 सकाळी 9 यावेळेत समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील.
महापालिकेने ठाणेकरांना पाणी वापरण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे आणि पाणी बचतीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. कमीत कमी दाबाने पाणीपुरवठा पाणी बंद केल्यानंतर, स्टेम प्राधिकरणाकडून जलवाहिन्यांच्या दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू केली जातील. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर, 1 ते 2 दिवसांपर्यंत पाणी कमी दाबाने पुरवठा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा अनुभव येऊ शकतो. महापालिकेने नागरिकांना पाणी वापरण्याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली आहे, कारण या कामांमुळे थोड्या काळासाठी पाणी कमी येईल.






