याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातच नव्हे तर शहरालगत असलेल्या परिसरांमध्ये देखील टीएमटीच्या बस सेवा देतात. सध्याच्या घडीला टीएमटीच्या 380 बसमधून नियमीतपणे 3 ते सव्वातीन लाख प्रवासी प्रवास करतात. 2015 पासून टीएमटीने तिकीट दरवाढ देखील केलेली नाही. डिझेल आणि सीएनजीच्या दरात कमालीची वाढ होत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थी यांना सवलत दिली आहे. त्यामुळे पालिकेला महिन्याकाठी 1 ते दीड कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागत आहे.
advertisement
Bird Park: दुर्मिळ पक्ष्यांना मिळणार मुंबईत निवारा, महापालिका करणार 166 कोटींचा खर्च
सध्याच्या घडीला टीएमटीला एका दिवसात 28 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे. महिन्याकाठी टीएमटीचं उत्पन्न 7 ते 8 कोटी रुपयांपर्यंत जाते. पालिकेच्या मालकीच्या 73 बस असून त्यापैकी सुमारे 40 बस रस्त्यावर धावतात. आनंदनगर येथून 240 डिझेल आणि 123 इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर चालतात.
ठाण्यातील सर्व बस डेपोमधून टीएमटी सेवा चालते. सर्वात मोठा डेपो वागळे इस्टेट येथे आहे. ठाण्याहून भिवंडी, मीरा रोड, मुलुंड, बोरिवली, अंधेरी, नालासोपारा, बीकेसी आणि डोंबिवलीपर्यंत टीएमटीच्या बसेस प्रवासी वाहतूक करतात. मात्र, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलती आणि 10 वर्षांपासून न केलेल्या भाडेवाढीमुळे टीएमटीला मोठा आर्थिक फटका बसत आहे.