मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी महत्त्वाची घडामोड ठरली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी अचानकपणे दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीत युतीची चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून युतीवर आता शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात ठाकरे गट आणि मनसे युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
advertisement
ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील सर्वात मोठी घडामोडी नुकतीच झाली. मागील दोन तासांपासून साधारणपणे ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली. या चर्चेत काही महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या आहेत. दसरा मेळाव्यात ज्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती ती गोष्ट होणार आहे. दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी युतीची घोषणा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
उद्धव यांची आजची ही अचानक झालेली भेट फक्त दोन भावांमधील भेट नसून दोन नेत्यांमधील भेट असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी आजच्या भेटी कुटुंबातील सदस्य सोबत नाहीत. तर, उद्धव यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय संजय राऊत आणि अनिल परब आहेत.
आजची भेट राजकीय, ठाकरेंचे स्पष्ट संकेत..
आजची भेट ही कौटुंबिक नसून राजकीय बैठक असल्याची म्हटले जात आहे. आज राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीसोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अनिल परब देखील उपस्थित आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची ही भेट झाली असल्याची चर्चा आहे. आगामी मु्ंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जागा वाटप आणि काही महत्त्वाच्या जागांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत निकटवर्तीय समजले जाणारे संजय राऊत आणि अनिल परब हेदेखील उपस्थित आहेत. त्यामुळेच राजकीय चर्चा आजच्या बैठकीत होणार असल्याचे म्हटले जात आहे.
अनिल परब यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे रणनीतिकार म्हणून ओळखले जातात. अनिल परब यांना मुंबईतील प्रत्येक वॉर्डची माहिती आहे. त्यातील राजकीय समीकरणांवरही परब यांच्याकडे चांगली माहिती आहे. मनसेकडून राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर हे देखील सोबत आहेत. बाळा नांदगावकर हे राज यांचे निकटवर्तीय आहेत. मनसेकडून राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर हे देखील सोबत आहेत. बाळा नांदगावकर हे राज यांचे निकटवर्तीय आहेत.