महाराष्ट्रात दंगल घडवायची का?
संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिष्टा पणाला लावून काढायला का लावलं? वाघ्या कुत्र्याचे इतिहासात खूप मोठे योगदान आहे. होळकर यांनी जिर्णोद्धार केला म्हणून हा मुद्दा पुढे घेवून आलात का? असा सवाल देखील बाळासाहेब दोडतले यांनी विचारला. श्री क्षेत्र माहुली येथे खंड्या नावाच्या कुत्र्याचा पुतळा कसा चालतो? रायगडावर तुमची मक्तेदारी नाही. इतिहास संपवण्याचं पाप आपण करू नये, असं बाळासाहेब दोडतले यांनी संभाजीराजे यांना म्हटलं आहे. 31 मे ची तारीख का निवडली? त्यादिवशी अहिल्या देवीची जयंतीची तारीख आहे, या दिवशी महाराष्ट्रात दंगल घडवायची का? असा सवाल बाळासाहेब दोडतले यांनी विचारलाय.
advertisement
...तर धनगर समाज रायगडावर कडे कूच करेल - बाळासाहेब दोडतले
राज्यात असंतोष पसरवण्याचे काम करु नका. वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे, असं म्हणत बाळासाहेब दोडतले यांनी थेट इशारा दिला आहे. पुतळ्याला हात लावला तर संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज रायगडावर कडे कूच करेल, असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यानी दिला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना राजकीय पोळी भाजायची आणि महाराष्ट्र अशांत करायचा आहे. स्मारकाला हात लावनं तर सोडा नजर ही तिथं पर्यंत पोहचू देणारं नाही. राजे हे मागणं बर नव्हं... असं बाळासाहेब दोडतले यांनी यांनी म्हटलं आहे.
लक्ष्मण हाकेंची संभाजीराजेंवर टीका
दरम्यान, रायगड प्राधिकरण समितीवरून संभाजी राजे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात केली आहे. संभाजीराजे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करत आहेत. संभाजीराजेंनी 31 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिल्याने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
संभाजीराजे काय म्हणाले होते?
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी नजीक कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पूर्वी शासनाने हटवावी, अशी मागणी रायगड प्राधिकरण चे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. कोणती ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली वाघ्या कुत्रा समाधी 31 मे 2025 पूर्वी कायमस्वरूपी हटवावी, अशी विनंती संभाजीराजे यांनी केली आहे.