काय सांगतात पेठकर महाराज?
एका राशीतून दुसऱ्या राशीत सूर्य जेव्हा प्रवेश करतो तेव्हा ती संक्रांत होते. पौष महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे ती मकर संक्रांत होते आणि सध्या सूर्य कर्क राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे ही सिंह संक्रांत असते. 17 ऑगस्ट रोजी आलेल्या सिंह संक्रांतीच्या दिवशी नागरिकांनी सूर्यदेवतेची पूजा करण्याचं आवाहन पेठकर महाराजांनी केलंय. तसेच श्रीदेवी पूजा आणि या दिवशी दानधर्म केल्याने पुण्यप्राप्ती आणि शुभ फलप्राप्ती होते असेही सांगितले.
advertisement
या दिवसाला तूप संक्रांतीही नाव
सिंह संक्रांतीला तूप संक्रांत किंवा घी संक्रांत असेही म्हणतात. या दिवशी तुपाचं सेवन करण्याचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. तूप सेवन करण्याचं महत्त्व असं की या दिवशी तूप खाल्ल्याने राहू आणि केतूचा प्रभाव कमी होतो. मानवाला बुद्धी, बल आणि वृद्धी प्राप्त होते, असं सांगितलं जातं. सिंह संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जर सूर्याला जल अर्पण करून पूजन केलं आणि त्या दिवशी गरीब किंवा गरजूला दान केलं तर तुमच्या साठी फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळे तुम्हीही सूर्य देवतेचे पूजन करून सिंह संक्रांतीचा दिवस साजरा करू शकता, असं पद्माकर पेटकर महाराज सांगतात.





