विशेषतः ठाणे, कोकण पट्टा आणि काही किनारी जिल्ह्यांत पुढच्या आठवड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने पुढील आठवडाभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील अशी शक्यता व्यक्त केली. आज संपूर्ण महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज नाही, काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील.
पुढील आठवड्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी हा अंदाज दिलासा देणारा ठरत असला तरी, कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीमुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
दुसरीकडे विकेण्डला विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या आठवड्याच्या शेवटी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. ताशी 40 किमी वेगाने वारे वाहणार असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह होईल असा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आणि फळबागायतदारांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.