छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पाऊस कमी पडत असल्यामुळे शेती करणं अवघड जाते. पारंपरिक शेती केली तर पाहिजे तसे उत्पन्न भेटत नाही. म्हणून याचं पारंपारिक शेतीला फाटा देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने रेशीम शेतीचा प्रयोग केला. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यामधून लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
कशी केली रेशीम शेती करण्याची सुरुवात?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव या छोट्याशा गावातील शेतकरी संतोष वाघमारे हे रेशीम शेती करून आज महिन्याला लाखों रुपयांचे उत्पन्न कमवत आहेत. संतोष यांनी एम.ए. पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. संतोष यांचे आई-वडील हे शेतीच करत होते. संतोष यांना असं वाटलं की आपण शेतीमध्येच वेगळा प्रयोग करावा म्हणून त्यांनी रेशीम शेती करण्याचे ठरवलं. रेशीम शेती कशी करायची याचे आधी त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि शेती करायला सुरुवात केली. 2010 पासून हा व्यवसाय ते करत आहेत.
गरिबांसाठी चालतं फिरतं ATM, 6 लाखांचा नफा, तुम्हालाही होऊ शकतो मोठा फायदा?
घरच्यांचा होता विरोध
रेशीम शेती करायला त्यांच्या आई-वडीलांचा विरोध होता. मात्र घरच्यांचा विरोध जाऊन त्यांनी रेशीम शेती करायचं ठरवलं. सुरुवातीला संतोष यांनी घरातील एका छोट्या रूममधून पाचशे रुपयांची अंडीपुंज घेऊन त्यातून सुरुवात केली. त्यांनी घेतलेल्या पाचशे रुपयांच्या अंडीपुंजमधून त्यांना 2010 साली 2 हजार उत्पन्न हे भेटलं. कमी खर्चात जास्त उत्पन्न भेटत आहे. यामुळे त्यांच्या घरच्यांनी सुद्धानंतर ही शेती करायची परवानगी दिली. सध्या संतोष वाघमारे हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत रेशीम शेती करतात.
कापड दुकान बंद पडलं म्हणून कोंबड्या पाळल्या, आता महिन्याला होतेय लाखोंची कमाई
संतोष वाघमारे यांचा चॉकी सेंटर देखील आहे. यातून ते अनेक शेतकऱ्यांना चॉकी देतात. या रेशीम शेती आणि चॉकीसेंटर मधून ते महिन्याकाठी 4 ते 5 लाखांचे उत्पन्न काढतात. संतोष यांच्याकडे काम करण्यासाठी सात ते आठ महिला देखील आहेत.
झेंडूच्या फुलांची लागवड अन् फक्त 3 महिन्यातच बदललं शेतकऱ्याचं नशीब; आता दिवसाला 1 लाख रुपये उत्पन्न
माझ्या घरच्यांचा या रेशीम शेतीला विरोध होता तरी सुद्धा मी ही शेती करण्याचा निर्णय घेतला. अणि त्यातून चांगलं उत्पन्न देखील मी आज कमावत आहे. शेती करायला माझे संपूर्ण कुटुंब मला मदत करतं, असं संतोष वाघमारे यांनी सांगितलं.