सातारा: झेंडूच्या फुलांना सणसमारंभात चांगली मागणी असते. त्यामुळे सध्याचा घडीला बाजारपेठेत झेंडूंच्या फुलांना मोठी मागणी आहे. यामुळे अनेक शेतकरी आता पारंपारिक शेती न करता झेंडूच्या फुलांची शेती करण्याला प्राधान्य देत आहेत. साताऱ्यातील शेतकरी वैभव माने यांनी टपोरा भगवा झेंडू याची लागवड केली आहे. यामधून त्यांना दिवसाला 1 लाख रुपये उत्पन्न होत आहे.
advertisement
कशी साधली किमया?
साताऱ्यातील रहिमतपूरमधील शेतकरी वैभव माने यांनी 14 एकरमध्ये टपोरा भगवा झेंडू याची लागवड केली आहे. लागवडीला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. 15 दिवस झाले फुलांची तोडणी देखील सुरू झाली आहे. दिवसाला दीड टन फुलांची तोडणी वैभव माने करत आहेत. ही फुले कॅरेट किंवा बास्केटमध्ये भरून मुंबई मार्केट किंवा पुणे मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात. सध्याच्या फुलाच्या बाजारभावाने 80 ते 140 रुपये किलो झेंडूच्या फुलाना दर मिळत आहे. दिवसाला झेंडूच्या फुलाचे दीड टन तोडणी होते किंवा जास्त देखील होत असते. त्यामुळे 1 लाख रुपये दिवसाचे उत्पन्न वैभव माने फुलांमधून घेत आहेत.
दुष्काळी भागातील शेतकऱ्याची कमाल, 2 एकरात कसं मिळवलं 75 लाखांचं उत्पन्न?, Video
सरासरी आणखी दोन महिने झेंडूच्या फुलाचा हंगाम सुरू राहणार आहे. सरासरी 50 रूपये जरी बाजार भाव मिळाला तरी देखील 1 एकरा मधून सरासरी 3 - साडेतीन लाख रुपये एवढी फुलाची विक्री होऊ शकते. त्यामूळे सरासरी 14 एकर फुलाच्या शेतीमधून रेकॉर्ड ब्रेक अशी 42 ते 45 लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास वैभव माने यांनी व्यक्त केला आहे.
पांढऱ्या स्ट्रॉबेरीला मिळतोय तिप्पट दर, पण शेतीसाठी घ्यावी लागणार या शेतकऱ्याची परवानगी
पावसाच्या परिस्थितीचा अंदाज पाहून ठिबकच्या सहाय्याने त्यांनी झेंडूच्या फुलांना पाण्याची सोय केली आहे. फुलाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा देखील वापर केला जातो. बदलत्या वातावरणाचा फटका झेंडूच्या फुलांना बसू नये आणि त्यांना आळी लागू नये यासाठी कीटकनाशकाची फवारणी देखील केली जाते, असं वैभव माने सांगतात.