गोयंका यांनी सोन्याच्या किमतीची केलेली तुलना केवळ गंमत नाही, तर 'महागड्या गाडीत पैसे गुंतवताय की सोन्यात?' असा थेट प्रश्न गुंतवणूकदारांना विचारणारी आहे! त्यांच्या या कॅल्क्युलेशनने स्पष्ट होते की, दीर्घकाळात सोने खरेदी करणे हे महागडी कार घेण्यापेक्षा कितीतरी पटीने फायदेशीर आहे... कारण गाडीची किंमत दरवर्षी घटते, तर सोन्याची झळाळी आणि किंमत वाढत जाते!
advertisement
गेल्या वर्षभरात सोन्या चांदीच्या दरांनी रॉकेटच्या स्पीडने नवीन उच्चांक गाठला आहे. चांदीचं तर काही विचारुच नका, सोन्याच्या दरांमागून आली आणि १ लाख ८१ हजारवर जाऊन पोहोचली आहे. वर्षभरात जवळपास ७०-८० हजार रुपयांचा रिटर्न्स या दरांनी दिला आहे. सोन्याच्या दरांनी रोज नवनवीन विक्रम मोडणं सुरूच ठेवलं. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव १,२१,५२५ प्रति १० ग्रॅम वर पोहोचला, म्हणजे एका किलो सोन्याची किंमत १.२१ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. या किमतीत तुम्ही आता Land Rover सारखी महागडी एसयूव्ही (SUV) गाडी सहज खरेदी करू शकता.
हर्ष गोयंका यांचं ट्विट ठरला चर्चेचा विषय
आरपीजी एंटरप्रायझेसचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सोन्याच्या वाढत्या किमतीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक ट्विट केलं आणि काही तासांतच ते तुफान व्हायरल देखील झालं. त्यांनी जे कॅलक्युलेशन सांगितलं ते विचार करुन तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. गोयंका यांनी गेल्या काही दशकांतील १ किलो सोन्याच्या किमतीची तुलना प्रसिद्ध गाड्यांच्या किमतीशी केली आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत १ किलो सोन्याची किंमत कशी कारच्या मॉडेलनुसार वाढत गेली आहे आणि आता ती लक्झरी गाड्यांच्या स्तरावर पोहोचली आहे.
१९९० च्या दशकात: १ किलो सोन्यातून मारुती ८०० खरेदी करता येत होती.
२००५ पर्यंत: १ किलो सोन्याची किंमत टोयोटा इनोव्हाच्या बरोबरीची झाली.
२०१० पर्यंत: सोन्याचा दर टोयोटा फॉर्च्यूनर कारच्या किमतीएवढा झाला.
२०१९ पर्यंत: १ किलो सोने बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्यासाठी पुरेसे होते.
२०३० चा विचार केला तर लॅण्ड रोवर ही लक्झरी कार खरेदी करण्याएवढी सोन्याची किंमत जाईल.
२०४० मध्ये 'प्रायव्हेट जेट' खरेदी करता येईल?
आज, एका किलो सोन्याची किंमत सुमारे १.२१ कोटी रुपये आहे, म्हणजे तुम्ही त्याच सोन्यातून आता लँड रोव्हर सारखी लक्झरी एसयूव्ही खरेदी करू शकता. गोयंका यांच्या अंदाजानुसार, पुढील १५ वर्षांनंतर म्हणजेच २०४० सालापर्यंत एका किलो सोन्याची किंमत इतकी वाढेल की, त्यातून एक प्रायव्हेट जेट देखील खरेदी करणे शक्य होईल. गोयंका यांची ही तुलना केवळ गंमत म्हणून नाही, तर तो एक महत्त्वाचा स्मार्ट गुंतवणुकीचा सल्ला आहे. दीर्घकाळासाठी सोन्याची गुंतवणूक केल्यास, त्याचे मूल्य तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त वाढू शकते, असा स्पष्ट संदेश गोयंका यांनी दिला आहे. सोने नेहमीच महागाईविरुद्ध बचाव करणारं एक टेक्नीक ठरलं आहे.
तुम्ही महागड्या गाड्या खरेदी करण्यापेक्षा ते पैसे सोन्यात गुंतवले तर त्याचा फायदा जास्त होईल. कारण गाड्यांची किंमती एखाद वर्षानंतर कमी व्हायला सुरुवात होते. गाडी जेवढी जुनी होत जाईल तेवढी किंमत कमी तर सोनं जेवढं जुन होत जातं तेवढी त्याची झळाळी म्हणजे किंमत वाढत जाते असं त्यांना थोडक्यात सांगायचं आहे. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा सोन्यात दीर्घकाळासाठी पैसे गुंतवले तर जास्त फायदा होऊ शकतो.