TRENDING:

Post Office KVP Scheme: 115 महिन्यात पैसे डबल, हा स्कॅम नाही, सामन्यांसाठी फायद्याचा सौदा, असं आहे पैशांचं गणित

Last Updated:

Post Office Kisan Vikas Patra Scheme: एका पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत, जिथे पैसे भरुन तुम्ही 115 महिन्यात पैसे डबल मिळवू शकता.

advertisement
Post Office KVP Scheme: असंख्य असे लोक आहेत, जे आपल्याकडील पैशांची योग्यती गुंतवणूक करु पाहातात. ज्यामुळे भविष्यात त्याचा फायदा होईल आणि गरजेच्या वेळी पैसे ही उपलब्ध होतील. तसे पाहाता मार्केटमध्ये अनेक गुंतवणूकीचे पर्याय आहेत. पण तरी देखील काही पर्यायात पैसे टाकणे हे जोखमीचे ठरु शकते. यामुळे पैसे कमावणे तर सोडाच, जे आहेत ते देखील हातचे निघून जातात. अशावेळी सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे हे जास्त सोयीस्कर आणि स्मार्ट ठरु शकतं.
Post Office KVP Scheme: 115 महिन्यात पैसे डबल, हा स्कॅम नाही, सामन्यांसाठी फायद्याचा सौदा, असं आहे पैशांचं गणित
Post Office KVP Scheme: 115 महिन्यात पैसे डबल, हा स्कॅम नाही, सामन्यांसाठी फायद्याचा सौदा, असं आहे पैशांचं गणित
advertisement

पोस्टाच्या अनेक योजना आहेत. ज्यात तुम्ही काही महिने किंवा वर्षासाठी ठरावीक रक्कम भरुन चांगला परतावा मिळवू शकता. अशाच एका पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत, जिथे पैसे भरुन तुम्ही 115 महिन्यात पैसे डबल मिळवू शकता.

Post Officeची भारी स्किम! फक्त व्याजातूनच कमावता येतील 2 लाख रुपये

किसान विकास पत्र, KVP Scheme ही पोस्ट ऑफिसची योजना आहे. या योजनेत ग्राहकांना केवळ 115 महिन्यात पैसा डबल मिळतात. आता ही योजना काय आहे? आणि त्यामध्ये कशी करता येईल गुंतवणूक? हे सविस्तर जाणून घेऊ.

advertisement

बँकेपेक्षा जास्त व्याज देते Post Office ची ही स्कीम, चान्स मिस केलात तर होईल पश्चाताप

तुम्ही किसान पत्र योजनेतंर्गत कितीही खाती उघडू शकता. सध्या या योजनेवर सरकारकडून 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. दर तीन महिन्याला व्याजात बदल होतो. हे खाते दोन प्रकारचे आहे एक KVP आणि दुसरं NSC खाते.

advertisement

  • पोस्ट ऑफिसमध्ये KVP आणि दुसरं, NSC खाते असा करा ऑनलाइन अर्ज
  • पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा
  • ‘जनरल सर्व्हिसेस’ वर जा.
  • नंतर ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ वर जा आणि शेवटी ‘नवीन विनंती’ वर जा
  • NSC खाते उघडण्यासाठी, ‘NSC’ खात्यावर क्लिक करा. KVP खाते उघडण्यासाठी, ‘KVP खाते’ वर क्लिक करा
  • advertisement

  • NSC खाते उघडण्यासाठी असलेली रक्कम जमा करा. योजनेतंर्गत, किमान 1000 अथवा 100 रुपयांच्या पटीत रक्कम जमा करा
  • पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक केलेले डेबिट खाते निवडा
  • अटी आणि शर्तीं वाचून क्लिक करा आणि स्वीकारा
  • ऑनलाइन खाते बंद करा
  • त्यात ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका आणि सबमिट बटण दाबा

आता प्रश्न असा की हे दोन्ही खाते ऑनलाइन कसे बंद करावे?

advertisement

  • पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा
  • ‘कॉमन सर्व्हिसेस’ अंतर्गत, ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ > ‘नवीन विनंती’ वर क्लिक करा
  • NSC साठी ‘NSC अकाउंट क्लोजर’ आणि KVP साठी ‘KVP अकाउंट क्लोजर’ वर क्लिक करा
  • राष्ट्रीय बचत खाते आणि किसान विकास पत्राचे खाते जे बंद करायचे आहे, ते निवडा आणि पुढील प्रक्रिया करा.

5 वर्ष पैसे गुंतवून कसे मिळवायचे 10,14,964, Post office ची सीक्रेट स्कीम तुम्हाला माहितीय का?

मराठी बातम्या/मनी/
Post Office KVP Scheme: 115 महिन्यात पैसे डबल, हा स्कॅम नाही, सामन्यांसाठी फायद्याचा सौदा, असं आहे पैशांचं गणित
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल