TRENDING:

रोहित शर्माची शेअर बाजारात Bulk deal, विकले 53 हजार 200 Share; एका झटक्यात मिळवले इतके लाख, शेअरहोल्डर्स हैराण

Last Updated:

Rohit Sharma Stock Market: वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने एका छोट्या आयटी कंपनीतील आपला अर्धा टक्क्यांहून अधिक हिस्सा विकून मोठी कमाई केली आहे. ज्यामुळे शेअर बाजारात चर्चा सुरू आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या रोहित शर्माने यावेळी शेअर बाजारातूनही चांगली कमाई केली आहे. वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ‘रिलायबल डेटा सर्व्हिसेस’ (Reliable Data Services) कंपनीतील अर्ध्या टक्क्यांहून अधिक हिस्सा विकला आहे. ही एक अतिशय छोटी कंपनी आहे, जी आयटी सेवा क्षेत्रात काम करते.

advertisement

एक्सचेंजवर उपलब्ध असलेल्या बल्क डीलच्या आकडेवारीनुसार रोहित शर्माने 29 ऑगस्ट रोजी ओपन मार्केट ट्रान्झॅक्शनद्वारे कंपनीचे 53,200 शेअर्स 163.91 रुपये प्रति शेअरच्या सरासरी भावाने विकले आहेत. या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे 87.2 लाख रुपये होती.

advertisement

डिसेंबर 2023 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रोहित शर्माकडे कंपनीचे 1,03,200 शेअर्स म्हणजेच 1 टक्के हिस्सा होता. परंतु मार्च 2024 मध्ये जारी झालेल्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये त्याचे नाव गायब झाले होते. कारण त्याचा हिस्सा 1 टक्क्यांपेक्षा कमी झाला होता.

advertisement

8वा वेतन आयोग लागू कधी, पगारवाढ किती? ताजे अपडेट; कर्मचाऱ्यांची उत्सुकता शिगेला

यादरम्यान रिलायबल डेटा सर्व्हिसेस’च्या शेअर्समध्ये गेल्या 7 दिवसांपासून जोरदार तेजी सुरू आहे. आज 29 ऑगस्ट रोजीही या शेअरने 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट गाठला आणि तो 163.91 रुपयांवर बंद झाला. गेल्या 5 दिवसांत या शेअरमध्ये सुमारे 73.2 टक्के वाढ झाली आहे. तरगेल्या एका महिन्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110% टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.

advertisement

ब्लॉक डीलमुळे...

रिलायबल डेटा सर्व्हिसेस’ व्यतिरिक्त शुक्रवारी अनेक इतर कंपन्यांच्या शेअर्समध्येही ब्लॉक डीलमुळे हालचाल दिसून आली. ‘अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज’चा शेअर 6.73३ टक्क्यांनी वाढून 346 रुपयांवर पोहोचला. महत्त्वाचे म्हणजे पोलुनिन इमर्जिंग मार्केट्स स्मॉल कॅप फंड एलएलसी’ने कंपनीचे 12,50,938 शेअर्स खरेदी केले, जो त्याच्या 1.1 टक्के हिश्श्याएवढा आहे. ही खरेदी 353.5 रुपये प्रति शेअर दराने झाली. ज्याची एकूण किंमत सुमारे 44.22 कोटी रुपये होती.

दुसरीकडे टार्सन्स प्रॉडक्ट्स’वर विक्रीचा दबाव राहिला. प्रयोगशाळेसाठी प्लास्टिकवेअर बनवणाऱ्या या कंपनीचा शेअर शुक्रवारी ०.४ टक्क्यांनी घसरून ३११.८ रुपयांवर बंद झाला. हा सलग १२ वा दिवस होता जेव्हा कंपनीचे शेअर घसरले. याचवेळी अनंतनाथ स्कायकॉनने कंपनीचे ७.७ लाख शेअर्स खरेदी केले.जो कंपनीच्या १.४४ टक्के हिश्श्याएवढा आहे. हा व्यवहार ३१५ रुपये प्रति शेअर दराने झाला. त्याचवेळी, ट्रू कॅपिटलने ४,१८,६१७ शेअर्स आणि कुबेर इंडिया फंडने ३.५ लाख शेअर्स याच भावाने विकले.

जून २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ट्रू कॅपिटलकडे टार्सन्स प्रॉडक्ट्सचे १२.६८ लाख शेअर्स म्हणजेच सुमारे २.३८ टक्के हिस्सा होता.

मराठी बातम्या/मनी/
रोहित शर्माची शेअर बाजारात Bulk deal, विकले 53 हजार 200 Share; एका झटक्यात मिळवले इतके लाख, शेअरहोल्डर्स हैराण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल