TRENDING:

एक दिवसांत 11,000 रुपयांनी महाग झाली चांदी, दिवाळीआधी नवा विक्रम, आणखी किती वाढणार दर?

Last Updated:

दिवाळीपूर्वी चांदीचा दर १ लाख १८ हजारांवर पोहोचला असून, सोन्याचा भाव १ लाख २४ हजार ७०० रुपये झाला आहे. तज्ज्ञांनी चांदी २ लाखांवर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे.

advertisement
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर असताना, सोने आणि चांदीच्या दरांनी अक्षरशः आसमान गाठलं. विशेषतः चांदीच्या दराने तर सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. जागतिक बाजारात चांदीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे एकाच दिवसात चांदीच्या दरात तब्बल ११,००० ची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. ही घटना दुसऱ्यांदा घडली आहे. यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी ११ हजार रुपयांनी चांदी महाग झाली होती. त्यामुळे आठवडाभरात सलग दुसऱ्यांचा चांदी महाग झाली आहे.
News18
News18
advertisement

चांदीचा दर १ लाख १८ हजारांवर; गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी

गेल्या अवघ्या पाच दिवसांमध्ये दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या फरकाने चांदी महागली आहे. सध्या चांदीचा भाव प्रति किलो १ लाख १८ हजार रुपये इतका झाला आहे. चांदीची ही विक्रमी दरवाढ प्रामुख्याने औद्योगिक मागणीमुळे होत आहे. स्मार्टफोनपासून ते सौर ऊर्जेच्या उपकरणांपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. औद्योगिक मागणी वाढत असल्याने नैसर्गिकरित्या किमती वाढत आहेत.

advertisement

बाजारातील तज्ज्ञांनी आता एक मोठा दावा केला आहे: "चांदी दिवाळीपर्यंत २ लाख रुपयांचा टप्पा पार करेल!" ही बातमी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची असली, तरी ज्यांच्या घरात यंदा लग्न आहे किंवा ज्यांना लक्ष्मीपूजनासाठी चांदी खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी मात्र ही दरवाढ मोठी चिंता घेऊन आली आहे.

चांदीच्या पाठोपाठ सोन्याच्या किमतीतही तेजी कायम आहे. मंगळवारी सोन्याचा भाव १ लाख २४ हजार ७०० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला होता, यात दीड हजार रुपयांची दरवाढ झाली आहे. सोन्याचे दर इतके झपाट्याने वाढले आहेत की, सर्वसामान्य माणसाला आता सोनं खरेदी करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे.

advertisement

५ वर्षांत सोन्याने दिलेला परतावा पाहा

मागील काही वर्षांत सोन्याने गुंतवणूकदारांना कसा परतावा दिला, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सोन्याचे दर (प्रति तोळा) पाहा:

सोन्याच्या दरांचा चढता आलेख

2020- 48651 प्रति तोळा

2021- 48720 प्रति तोळा

2022- 52670 प्रति तोळा

2023- 65330 प्रति तोळा

2024- 77913 प्रति तोळा

2025- 1,28,000 प्रति तोळा

advertisement

अवघ्या पाच वर्षांत सोन्याच्या दरात दुप्पट पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही दरवाढ केवळ आर्थिक धोरणे किंवा महागाईमुळे नसून, जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्या-चांदीकडे वळलेल्या गुंतवणूकदारांमुळे झाली आहे. सध्या सोन्या-चांदीचे दर रॉकेटच्या वेगाने धावत आहेत. दिवाळीत या मौल्यवान धातूंची खरेदी करायची की, फक्त दरवाढीचे आकडे पाहायचे, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
एक दिवसांत 11,000 रुपयांनी महाग झाली चांदी, दिवाळीआधी नवा विक्रम, आणखी किती वाढणार दर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल