या SMS मध्ये असं नमूद आहे की - "PAN (पॅन क्रमांक) xxx साठी डिसेंबर 31 रोजी संपलेल्या तिमाहीतील एकूण TDS रुपये xxx आहे, तर आर्थिक वर्ष 2024-25 साठी एकूण TDS रुपये xxx आहे. अधिक तपशीलांसाठी फॉर्म 26AS पहा." आयकर विभागाच्या या मेसेजचा उद्देश करदात्यांना त्यांच्या अंतिम तिमाहीतील आणि मागील आर्थिक वर्षातील जमा TDS ची माहिती देणे आहे.
advertisement
हा SMS मिळाल्यावर काय करावं?
हा मेसेज मिळाल्यानंतर काही करदाते गोंधळून जाऊ शकतात. त्यांना वाटू शकतं की, आता त्यांना जास्त कर भरावा लागणार नाही. मात्र, हा SMS फक्त माहिती पुरवण्यासाठी असून, त्याचा अर्थ असा नाही की कर भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही सेवा 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती, जेणेकरून करदात्यांना त्यांच्या पगारातून कपात झालेल्या TDS ची माहिती सहज मिळावी. या सुविधेमुळे कर्मचारी आपल्या पगाराच्या स्लिप आणि या संदेशातील माहिती यांची ताळमेळ घालू शकतात.
ITR भरण्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागेल?
पगारावर काम करणाऱ्या अन् टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गाला 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ITR (Income Tax Return) भरण्यासाठी जून महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. कारण नियमानुसार प्रत्येक नियोक्त्याने 15 जूनपर्यंत ‘फॉर्म 16’ जारी करणे बंधनकारक आहे.
‘फॉर्म 16’ म्हणजे काय?
फॉर्म 16 हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो नियोक्ता कर्मचाऱ्याला देतो. यात ITR भरण्यासाठी लागणारी सर्व महत्त्वाची माहिती असते.
- फॉर्म 16 मध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात केलेल्या TDS आणि टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स (TCS) ची सविस्तर माहिती असते.
- हा फॉर्म मिळाल्यानंतर करदाता आपली ITR प्रक्रिया सुरू करू शकतो.
करदात्यांसाठी उपयुक्त सेवा
हा SMS सेवा करदात्यांसाठी उपयुक्त ठरू शकते, कारण यामुळे त्यांना कर कपातीची अचूक माहिती मिळते आणि भविष्यातील आयकर नियोजन सोपे होते. ITR भरताना यामेसेजमधील आकडे आणि नियोक्त्याने दिलेल्या पगाराच्या स्लिप यांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : SBI FD Scheme: तुमच्याकडे शेवटची संधी! 31 मार्चनंतर बंद होणार SBI ची खास स्कीम
हे ही वाचा : Gold Rate: सोनं 90000 पार जाणार? आज पुन्हा वाढले 24 कॅरेटचे दर, तोळ्याला किती पैसे मोजावे लागणार?