SBI FD Scheme: तुमच्याकडे शेवटची संधी! 31 मार्चनंतर बंद होणार SBI ची खास स्कीम

Last Updated:

SBI Amrit Kalash FD: 31 मार्चनंतर ही योजना बंद होणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही.

News18
News18
मुंबई: शेअर मार्केट, सोनं या सगळ्या गोष्टीत गुंतवणूक असो किंवा नसो पण सर्वसामान्य माणसाचं हक्काची आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून FD कडे पाहिलं जातं. अगदी इमर्जन्सीच्या काळात एफडीमधून सहज पैसे काढता येतात. इतकंच नाही तर त्यावर लोनही घेता येतं. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या ग्राहकांना अनेक एफडी योजना (FD schemes) ऑफर करत आहे.
एसबीआयची योजना कमी वेळेत जास्त व्याज देणारी आहे. यापैकी काही एफडीवर 400 दिवसांमध्ये 7.60 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. जर तुम्हीही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एसबीआयची एफडी एक उत्तम पर्याय आहे. मात्रयामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे शेवटची संधी आहे. 31 मार्चनंतर ही योजना बंद होणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही.
advertisement
एसबीआय अमृत कलश एफडी योजना
भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अमृत कलश एफडी योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. या एफडीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी 400 दिवसांचा आहे.
सामान्य नागरिकांना 7.10% व्याजदर मिळतो.
ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदराचा फायदा मिळतो.
जर तुम्ही सुरक्षित आणि चांगला परतावा (return) शोधत असाल, तर या योजनेत लवकर गुंतवणूक करा.
advertisement
एसबीआय अमृत वृष्टी एफडी योजना
एसबीआयची आणखी एक खास योजना म्हणजे अमृत वृष्टी एफडी, जी 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. या एफडीचा कालावधी 444 दिवसांचा आहे.
सामान्य नागरिकांना 7.25% व्याजदराचा फायदा मिळतो.
ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर मिळतो.
ही योजना देखील गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे.
आयडीबीआय बँक उत्सव कॉलेबल एफडी
आयडीबीआय बँकेच्या उत्सव कॉलेबल एफडी योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख देखील 31 मार्च 2025 आहे. या एफडीचा कालावधी 555 दिवसांचा आहे.
advertisement
सामान्य नागरिकांना 7.40% व्याजदर मिळतो.
ज्येष्ठ नागरिकांना 7.90% व्याजदराचा फायदा मिळतो.
ही योजना विशेषतः त्यांच्यासाठी उत्तम आहे, जे दीर्घ कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूक करू इच्छितात.
एफडीमध्ये गुंतवणूक का करावी?
या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला ठराविक वेळेत चांगला परतावा मिळेल. जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या योजना नक्कीच निवडा आणि गुंतवणुकीच्या शेवटच्या तारखेपूर्वी त्याचा फायदा घेऊ शकता.
advertisement
(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. गुंतवणूक करण्याआधी योजनेची सगळी कागदपत्र वाचून मगच गुंतवणूक करा. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही नफ्यातोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/मनी/
SBI FD Scheme: तुमच्याकडे शेवटची संधी! 31 मार्चनंतर बंद होणार SBI ची खास स्कीम
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement