Gold Rate: सोनं 90000 पार जाणार? आज पुन्हा वाढले 24 कॅरेटचे दर, तोळ्याला किती पैसे मोजावे लागणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Gold Silver Rate Today: गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किमतीत तब्बल 2200 रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे सोन्यानं विक्रमी उच्चांक गाठला आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांत विक्रमी वाढ झालीये. त्यामुळे येत्या काही काळात सोनं 90 हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी पुन्हा 24 कॅरेट सोनं 200 रुपयांनी महाग झालं. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोनं सर्वसामान्यांचा घाम काढत आहे.
नाशिकच्या सराफा बाजारात चालू आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल 2200 रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे शनिवारी 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 85 हजार 100 रुपयांवर गेले आहेत. तर जीएसटीसह ग्राहकांना 87 हजार 650 रुपये मोजावे लागत आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील आठवडाभरात 3 हजार रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे चांदीचे भाव 96 हजार 500 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत.
advertisement
दरम्यान, चालू वर्षात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ दिसून आली आहे. आकडेवारी पाहिली 31 डिसेंबरच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सोन्याचा भाव 77,500 रुपये होता. तर आज शनिवारी सोन्याचा भाव 85,100 रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ असा की सोन्याच्या किमतीत आत्तापर्यंत प्रति तोळा 7 हजार 600 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे.
advertisement
90 हजार पार जाणार?
अमेरिकेचं धोरण आणि जागतिक घडामोडींचा सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. तसेच सोन्याचे दर 90 हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
February 08, 2025 1:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Rate: सोनं 90000 पार जाणार? आज पुन्हा वाढले 24 कॅरेटचे दर, तोळ्याला किती पैसे मोजावे लागणार?