TRENDING:

Animal Care: भटक्या प्राण्यांची होणार भारी सोय, मालाडला उभं राहणार अत्याधुनिक रुग्णालय

Last Updated:

Animal Care: या रुग्णालयात उपचार, नसबंदी, आश्रय आणि अंत्यसंस्कार यांसारख्या सर्व सेवा दिल्या जाणार आहेत. जवळच प्राण्यांची दहनभूमीही असल्याने सर्व सुविधा एकत्र उपलब्ध होतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: हाय कोर्टाने भटक्या श्वानांबाबत दिलेल्या निर्णयामुळे सध्या भटक्या प्राण्यांचा मुद्दा देशभर गाजत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भटक्या प्राण्यांचे उपचार, नसबंदी आणि देखभालीसाठी महानगरपालिका मालाड पश्चिम येथे एका अत्याधुनिक प्राणी रुग्णालयाची उभारणारी करणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून पुढील दीड ते दोन वर्षांत हे रुग्णालय पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Animal Care: भटक्या प्राण्यांची होणार भारी सोय, मालाडला उभं राहणार अत्याधुनिक रुग्णालय
Animal Care: भटक्या प्राण्यांची होणार भारी सोय, मालाडला उभं राहणार अत्याधुनिक रुग्णालय
advertisement

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील एव्हरशाईन नगर परिसरात हे अत्याधुनिक प्राणी रुग्णालय उभारलं जाणार आहे. सध्या याठिकाणी कॅटल पॉइंट (भटक्या जनावरांचा कोंडवाडा) आणि श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. या सुविधांचं आधुनिकीकरण करून भव्य रुग्णालय सुरू केलं जाणार आहे. या रुग्णालयात उपचार, नसबंदी, आश्रय आणि अंत्यसंस्कार यांसारख्या सर्व सेवा दिल्या जाणार आहेत. जवळच प्राण्यांची दहनभूमीही असल्याने सर्व सुविधा एकत्र उपलब्ध होतील.

advertisement

Mumbai News: किती तो क्रूरपणा, शेजाऱ्याच्या मांजराला 5व्या मजल्यावरून दिला धक्का

देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिया पठाण म्हणाले, "मालाडमधील हे आधुनिक प्राणी रुग्णालय भटक्या प्राण्यांच्या आरोग्यसेवेत मोठी क्रांती घडवेल. यामुळे उपचार, नसबंदी आणि देखभाल एकाच ठिकाणी होऊन नागरिकांनाही दिलासा मिळेल. आम्ही हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत."

advertisement

या चार मजली रुग्णालयात म्हशी, गायी, बैल यांसारख्या मोठ्या प्राण्यांसाठी आणि श्वान, मांजरे यांसारख्या लहान प्राण्यांसाठी स्वतंत्र विभाग असतील. अत्याधुनिक उपचार सेवा, रोग निदान प्रयोगशाळा, आयपीडी व ओपीडी सुविधा उपलब्ध असतील. हे रुग्णालय एकावेळी 50 प्राण्यांना हाताळू शकेल. हा प्रकल्प सार्वजनिक व खासगी भागीदारीतून राबवला जात आहे. श्रीमद राजचंद्र चॅरिटेबल जीवदया ट्रस्ट भागीदार असणार आहे. बांधकाम, डॉक्टर व कर्मचारी नियुक्ती तसेच संचालनाची जबाबदारी ट्रस्टकडून पार पाडली जाईल. महानगरपालिकेला यासाठी कोणताही आर्थिक खर्च करावा लागणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Animal Care: भटक्या प्राण्यांची होणार भारी सोय, मालाडला उभं राहणार अत्याधुनिक रुग्णालय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल