Mumbai News: किती तो क्रूरपणा, शेजाऱ्याच्या मांजराला 5व्या मजल्यावरून दिला धक्का
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Mumbai News: बोरिवली पश्चिम येथील 'कृष्णा क्लासिक' या इमारतीत म्हात्रे कुटुंब राहत आहे. त्यांच्याकडे 'चॉकलेट' नावाचं मांजर पाळलेलं होतं. घरामध्ये साफसफाई करत असताना ते आपल्या मांजराला फ्लॅटसमोर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये खेळण्यासाठी सोडत होते.
मुंबई: अनेक प्राणीप्रेमी व्यक्तींना आपल्या घरामध्ये मांजर किंवा श्वान पाळण्याची आवड असते. मुंबईसारख्या शहरांमध्ये देखील अनेकजण आपल्या घरामध्ये प्राणी पाळतात आणि त्यांच्यावर कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम करतात. मात्र, काही व्यक्तींना या प्राण्यांचा इतका तिटकारा असतो की ते या प्राण्यांना जवळही फिरकू देत नाही. प्रसंगी त्यांचा जीव घेण्यास देखील मागेपुढे बघत नाही. मुंबईमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरिवलीमध्ये एका व्यक्तीने मांजराला पाचव्या मजल्यावरून ढकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. हा अमाणूष प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला असून 79 वर्षीय विलास पाठारे या व्यक्ती विरुद्ध बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिम येथील 'कृष्णा क्लासिक' या इमारतीत म्हात्रे कुटुंब राहत आहे. त्यांच्याकडे 'चॉकलेट' नावाचं मांजर पाळलेलं होतं. घरामध्ये साफसफाई करत असताना ते आपल्या मांजराला फ्लॅटसमोर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये खेळण्यासाठी सोडत होते. रविवारी नेहमीप्रमाणे त्यांनी मांजराला फ्लॅटसमोर सोडलं होतं. काही वेळानंतर मांजर बेपत्ता झाली असता म्हात्रे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. त्यांचं मांजर इमारतीखाली मृतावस्थेत सापडलं. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने म्हात्रेंनी फ्लॅटबाहेर लावलेले सीसीटीव्ही तपासले. त्याच इमारतीमध्ये राहणारे विलास पाठारे हे मांजराला मारहाण करून काठीने पाचव्या मजल्यावरून ढकलताना दिसले. या प्रकारामुळे संतापलेल्या म्हात्रेंनी पोलीस तक्रार दिली.
advertisement
विद्यापीठात आढळला प्राण्याचा सांगडा
दुसऱ्या एका घटनेमध्ये, मुंबई विद्यापीठाच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीलजवळ सोमवारी एका मृत जनावराची कातडी आणि सांगाडा सापडला. याबाबत माहिती मिळताच, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हे अवशेष ताब्यात घेतले. प्राण्याची कत्तल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 10:06 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Mumbai News: किती तो क्रूरपणा, शेजाऱ्याच्या मांजराला 5व्या मजल्यावरून दिला धक्का