Mumbai Fire News: आधी धूर निघाला नंतर पेट घेतला, गोरेगाव इथे अलिशान इमारतीत भीषण आग

Last Updated:

गोरेगाव पश्चिम जवाहर नगरमधील शालीमार मिरेकल इमारतीला भीषण आग लागली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने मदत केली, जीवितहानीबाबत अद्याप माहिती नाही.

News18
News18
विजय वंजारा, प्रतिनिधी गोरेगाव: आताची सर्वात मोठी बातमी, आज पुन्हा एकदा गोरेगाव इथे इमारतीला भीषण आग लागली आहे. गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर परिसरात असलेल्या शालीमार मिरेकल या इमारतीला भीषण आग लागली. या आगीचे कारण मात्र कळू शकलं नाही. आग लागल्याची माहिती तातडीनं अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. धुराचे मोठे लोट दूरपर्यंत दिसत होते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आग विझवण्याबरोबरच इमारतीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे कामही सुरू आहे. आगीत सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम वेगाने सुरू असून, लवकरच आग आटोक्यात आणली जाईल अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Fire News: आधी धूर निघाला नंतर पेट घेतला, गोरेगाव इथे अलिशान इमारतीत भीषण आग
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement